Tuesday, March 5, 2024

अजय-तब्बूच्या जोडीची पुन्हा रुपेरी पडद्यावर जादू, ‘भोला’ने पहिल्याच दिवशी कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

दृश्यम 2‘सारख्या दमदार चित्रपट दिल्या नंतर अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी थिएटरमध्ये परतला आहे. अजय देवगण आणि तब्बूची मुख्य भूमिका असलेला बहुप्रतिक्षित ‘भोला‘ चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. रामनवीच्या दिवशी ‘भोला’ बनलेल्या या अभिनेत्याची कलाकृती आणि चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खूप आवडली आहे, याचा अंदाज या चित्रपटाला सोशल मीडियावर मिळणाऱ्या प्रतिक्रिया पाहून आपण लावू शकतो. दरम्यान, आता ‘भोला’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तिकीट खिडकीवर किती कोटींची कमाई केली? चाल तर जाणून घेऊया.

‘भोला’ चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या अजय देवगणला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर अॅक्शन आणि थ्रिलरचा धडाका असलेला हा चित्रपट पाहून प्रत्येकजण याला धडाकेबाज कामगिरी म्हणत आहे. म्हणजे तब्बू आणि अजय देवगणच्या जोडीची जादू पुन्हा एकदा सिनेरसिकांवर चालल्याचे स्पष्ट झाले आहे.

माध्यमातील वृत्तांनुसार, जवळपास 125 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या अजय देवगणच्या अॅक्शन एंटरटेनर चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. ‘भोला’च्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी 11.50 कोटींचा व्यवसाय केला आहे, जे की, हे एक चांगले ओपनिंग मानले जाते. मात्र, ‘दृश्यम 2’च्या तुलनेत ‘भोला’ पहिल्या दिवसाच्या व्यवसायात मागे पडल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या अजय देवगणच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तिकीट खिडकीवर 15.38 कोटींचा व्यवसाय केला होता. मात्,र आगामी वेळात ‘भोला’च्या कलेक्शनमध्ये तेजी येऊ शकते, असे मानले जात आहे.

चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे झाले तर, गुन्हेगार ‘भोला’ 10 वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर आपल्या लहान मुलीला भेटण्यासाठी घरी जात आहे. मात्र, त्याचा प्रवास तितकासा सोपा नाही. भोलाला वाटेत अनेक अडचणींमधून जावे लागते. ‘भोला’ चित्रपटात तब्बू आणि अजय देवगण यांच्याशिवाय अमला पॉल, दीपक डोबरियाल, संजय मिश्रा आणि गजराज राव हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.(bholaa box office collection bollywood actor ajay devgn and actress tabu starerr film earnings on day 1 gets massive response from public )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ऑस्कर विजेत्या गुनीत मोंगा यांच्याशी भेट झाल्यानंतर पीएम नरेंद्र मोदी यांनी ‘द एलिफेंट व्हिस्पर्स’बद्दल लिहिले…

रामनवमीला दीपिका चिखलीया बनल्या ‘सीता माँ’; 35 वर्षे जुनी साडी नेसून, चाहत्याना केले थक्क

हे देखील वाचा