Friday, December 8, 2023

प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी होणार अजय देवगणच्या ‘भोला’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या आगामी ‘भोला‘ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 30 मार्च 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ‘भोला’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणारे प्रेक्षक अनेकदा सोशल मीडियावर चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चबाबत प्रश्न विचारताना दिसतात. अशात आता उत्तर सापडले आहे. ‘भोला’च्या ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर झाली आहे. खुद्द अजय देवगणने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली आहे.

अजय देवगण (ajay devgn) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. यासोबतच या चित्रपटाचा ट्रेलर 6 मार्चला प्रदर्शित होत असल्याची माहिती अभिनेत्याने दिली आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याचा नवीन चित्रपटातील लूक दिसत आहे. पाेस्ट शेअर करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “भोलाचे वेड सुरू! या चित्रपटाचा ट्रेलर चार दिवसांत म्हणजेच 6 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.”

अभिनेत्याच्या या पोस्टवर युजर्सचा रंजक प्रतिसाद मिळत आहे. ही बातमी कळताच चाहते आनंदात आहेत. अजय देवगणचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट ‘दृश्यम 2’ ने बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळवले हाेते. या चित्रपटात त्याच्यासाेबत तब्बूही दिसली होती. अशात आता पुन्हा एकदा अजय देवगण आणि तब्बू ‘भोला’ चित्रपटात स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

‘भोला’ या चित्रपटाविषयी सांगायचे झाले, तर अजय देवगण अभिनेत्यासाेबतच दिग्दर्शनाची जबाबदारीही पार पाडत आहे. तो या चित्रपटाचा सहनिर्माताही आहे. विशेष म्हणजे ‘भोला’ हा तमिळ चित्रपट ‘कैथी’चा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट 2019 साली प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये अभिनेता कार्ती दिसला होता. भोलाशिवाय अजय देवगणही ‘मैदान’ या चित्रपटात दिसणार आहे.(bollywood actor ajay devgn tabu deepak dobriyal sanjay mishra bholaa movie trailer launch date declared )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रजनीकांत यांनी केली त्यांच्या १७० व्या चित्रपटाची घोषणा, टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित सिनेमात दिसणार थलाइवा

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान श्रद्धाबद्दल करण्यात आली नारेबाजी; चाहते म्हणाले, ’10 रुपयांची पेप्सी, श्रद्धा कपूर…’

हे देखील वाचा