Monday, December 9, 2024
Home बॉलीवूड पावसामुळे लांबला भूषण कुमारची बहीण तिशा हिचा अंत्यसंस्कार, संध्याकाळी होणार प्रार्थना सभा

पावसामुळे लांबला भूषण कुमारची बहीण तिशा हिचा अंत्यसंस्कार, संध्याकाळी होणार प्रार्थना सभा

भूषण कुमारची चूलत बहिण आणि टी-सीरीज के सह-संस्थापक आणि अभिनेते कृष्ण कुमार यांची मुलगी तिशा कुमार हिच निधन झालं सोमवारी तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. तिच्या अंतिम संस्कारात टी-सीरीज परिवार आणि त्यांचे जवळचे मित्र सहभागी झाले होते. तिच्या अंतिम संस्कारात मुराद खटानी आणि त्यांचा मुलगा सुद्धा सहभागी झाला होता.

मिडिया रिपोर्टनुसार तिशा कुमार हि कॅन्सरशी लढत होती. तिने वयाच्या २१साव्या वर्षी या जगातून निरोप घेतला. रिपोर्टनुसार तिचा इलाज जर्मनीमध्ये चालू होता पण ती कॅन्सर सोबतची लढाई हरली. तिशा कुमारचे वडिल अभिनेते कृष्ण कुमार हे १९९५ मध्ये’बेवफा सनम’ या सिनेमात कृष्ण कुमार, शिल्पा शिरोडकर,अरुणा ईरानी आणि शक्ति कपूर या कलाकांरांसोबत झळकले होते.

तिशाचा जन्म ६ सप्टेंबर २००३ ला झाला होता. तिशा हि लाइमलाइट पासून दूर राहत होती. ती शेवटची ‘एनिमल’ या सिनेमाच्या प्रिमियमच्या इवेंटमध्ये आपले वडिल कृष्ण कुमार यांच्यासोबत साथ रेड कार्पेटवर झळकली होती. तिच्या अंतिम संस्कारात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यात साई मांजरेकर, रितेश देशमुख, फराह खान यांना स्पॉट केल गेलं. सोबतच तिची बहिण तुलसी कुमार आणि खुशाली कुमार पण या अंतिम संस्कारात पोहचल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

बेकायदा मालमत्ता बांधकामाबाबत रणदीपला दिलासा नाही, न्यायालयाने रद्द केली कारणे दाखवा नोटीस
नताशापासून दूर जाताच हार्दिकची अनन्यासोबत झाली गट्टी ? इंस्टाग्रामवर एकमेकांना केले फॉलो

हे देखील वाचा