Saturday, December 7, 2024
Home मराठी दुसऱ्याच दिवशी बीग बॉसच्या घरात राडा, टास्कवरुन झाली दोन स्पर्धकांत…

दुसऱ्याच दिवशी बीग बॉसच्या घरात राडा, टास्कवरुन झाली दोन स्पर्धकांत…

बिग बॉसचा १४ वा सिझन शनिवारपासून सुरू झाला आहे. बिग बॉस या कार्यक्रमात मजा मस्करी, भांडणे नेहमी पाहायला मिळतात. यातील पहिला दिवस आनंदात गेला. परंतु आता भांडणे सुरू झाली आहेत. गेल्यावेळीच्या स्पर्धकांपैकी पहिल्या २ आठवड्यांसाठी पाहुणे म्हणून सामील झालेले गौहर खान आणि सिद्धार्थ शुक्ला यांच्यात भांडण झाले आहे. टास्कदरम्यान या दोघांमध्ये भांडण झाले.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बिग बॉसच्या १४ व्या सिझनच्या एका व्हिडिओतून याची माहिती मिळाली आहे. गौहर आणि सिद्धार्थ यांच्या भांडणाचा व्हिडिओ बिग बॉस १४ जासूस नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत गौहर खान आणि सिद्धार्थ शुक्ला यांच्यात टास्कवरून शाब्दिक वाद पाहायला मिळाला. दोघेही एकमेकांवर ओरडताना दिसत आहेत.

खरंतर व्हिडिओत दाखविले आहे की, रूबीना दिलैक टास्कमध्ये आपल्या कपड्यांबाबत सिद्धार्थसोबत चर्चा करत असते. सिद्धार्थ टास्कदरम्यान बिग बॉसच्या घरात एंट्री घेण्याबद्दल बोलतो. तो म्हणतो की त्याला एका आठवड्यापर्यंत कोणतेही सामान मिळणार नाही. व्हिडिओत पुढे दाखविले आहे की, सिद्धार्थ शुक्ला आणि गौहर खान टास्क करण्याबाबत एकमेकांशी वाद घालत आहेत.

व्हिडिओच्या शेवटी सिद्धार्थ म्हणतो की, त्याच्यासाठी टास्क कसा पूर्ण करता येईल हे महत्त्वाचे आहे, तर गौहर म्हणते की तू टास्क पूर्ण करण्यापूर्वीच संपवला आहे. सोशल मीडियावर बिग बॉसच्या १४ व्या सिझनशी संबंधित हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओंना चाहत्यांकडून पसंती मिळत आहे.

https://twitter.com/suzy_crxn/status/1312807963577339910

विशेष म्हणजे बिग बॉस १४ मध्ये यावेळी विशेष दर्शकाची कन्सेप्ट ठेवण्यात आली आहे. ज्यामध्ये बिग बॉसचे चर्चा स्पर्धक सिद्धार्थ शुक्ला, हिना खान आणि गौहर खान पाहुणे म्हणून पोहोचले आहेत.

बिग बॉस सिझन १४चे प्रसारण शनिवारपासून सुरू झाले आहे. अशामध्ये पुढील तीन ते साडे तीन महिने प्रेक्षकांसाठी खूपच मनोरंजक असणार आहेत. बिग बॉसच्या दुसऱ्या दिवशी वरिष्ठ स्पर्धक गौहर खान हिने इतर सर्वांना त्यांचे काम दिले आहे, तर सिद्धार्थ शुक्लाने हे पाहिले की, झोपण्यासाठी कोणाला कोणता बेड दिला जाईल. गौहरचे काम हे घरातील इतर सदस्यांमध्ये किचनच्या कामाचे वाटप करणे आहे.

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा