भेडीया सिनेमाचा महा भयंकर ट्रेलर झाला रिलीज; क्रिती सेननने केला व्हिडीओ शेअर, पाहा टिझर


वरुण धवन आणि क्रिती सेनन या जोडीने बॉलिवूडमध्ये एकाच चित्रपटात एकत्र काम केले. परंतु या एकाच चित्रपटाने त्या दोघांनाही खूप प्रसिध्दी मिळाली. ‘दिलवाले’ या चित्रपटातून वरुण आणि क्रितीची जोडी प्रेक्षकांसमोर आली होती. आणि त्यांना प्रेक्षकांकडून खूप प्रेम देखील मिळाले. आता हो जोडी प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला येत आहे.  क्रिती-वरुण -यांचा आणखी एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वरुण-क्रिती यांचा ‘भेडीया’ हा चित्रपटच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर झाली. भेडिया हा चित्रपट येत्या 14 एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीजर नुकताच रिलीज झाला आहे. तो खूपच भयानक असल्याचे चाहते म्हणत आहे.

भेडिया या चित्रपटाचा टीजर अभिनेत्री क्रिती सेनन हिने या  तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. टीजरमध्ये असे दिसत आहे की, एक व्यक्ती एका झाडाच्या मागे उभी राहून मोठ्याने ओरडत आहे. त्यानंतर तिथे एका लांडग्याची आकृती दिसते. त्यानंतर तो लांडगा एका व्यक्तीवर अटॅक करताना दिसतो.

या चित्रपटाच्या टीजरच्या व्हिडिओमध्ये एक मनुष्य रात्रीच्या अंधारात उभा असताना दिसतो आणि तेव्हाच मागे पौर्णिमेचा चंद्र दिसतो. हा 38 सेकंदाचा व्हिडिओ खूपच खतरनाक आहे. टिजरमध्ये या सीन व्यतिरिक्त असे एक बॅकग्राउंड म्युझिक आहे, जे ऐकायला खूपच भयानक वाटते. या चित्रपटाच्या टीजरला शेअर करत क्रितीने असे लिहले आहे की,” स्त्री आणि रूहिला भेडियाकडून प्रणाम.”

क्रिती सेननने या टीजरचा व्हिडिओ शेअर केला आहे. यातील कॅप्शन एक मजेशीर मेसेज देत आहे. खरतर भेडीया हा चित्रपट हॉरर फिल्म यूनिवर्सचा एक हिस्सा आहे. स्त्री आणि रूही हे देखील यूनिवर्सल फिल्म आहेत.

वरुण- क्रितीचा भेडीया हा चित्रपटात हॉरार आणि कॉमेडीचे मिश्रण असणार आहे. ‘अमर कौशिक यांनी’ ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अखेर गुड न्यूज आलीच.! करिना आणि सैफ दुसऱ्यांदा झालेत आई-बाबा; पाहा कोण आलंय जन्माला, युवराज की युवराज्ञी?

-सैफ अली खानवर फिदा होती परिणीती, तर ऋतिक रोशन होता ‘या’ अभिनेत्रीचा क्रश; जाणून घ्या बॉलिवड कलाकारांचे क्रश

-लव्ह, रिलेशनशीप आणि आत्महत्या…? जिया खानच्या मृत्यूचं आजवर न सुटलेलं कोडं!


Leave A Reply

Your email address will not be published.