भाजप खासदार सुधीर गुप्तांचे आमिर खानवर वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, ‘आजोबा बनायच्या वयात तिसऱ्या बायकोच्या शोधात…’


चित्रपटसृष्टीतील घडणाऱ्या घटनांवर सोशल मीडियावर भरपूर चर्चा रंगताना आपण पाहतो. सिनेसृष्टीत जे काही घडते, ते राष्ट्रीय बातम्या असतात. त्यासर्व गोष्टींवर चर्चा करणे हे नेटकऱ्यांचे आणि इतर लोकांचे कामच असते. मात्र, मागील काही काळापासून या गोष्टींवर राजकारणांतून देखील मोठ्या प्रमाणावर मतं यायला लागली आहेत. कलाकारांच्या वैयक्तिक आणि व्यायसायिक आयुष्यात घडणाऱ्या बाबींवर अनेक नेते मंडळी पुढे येऊन मतं बहुतकरून विवादित मतं देताना आपण बऱ्याचदा बघतो.

नुकतेच भाजपचे मध्यप्रदेशमधील खासदार असणाऱ्या सुधीर गुप्तांनी आमिर खानवर एक विवादित वक्तव्य केले आहे. आमिर खानने नुकतेच त्याचे दुसरे लग्नही मोडले आहे. किरण राव आणि आमिर यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला आहे. सोशल मीडियावर या दोघांनी घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले होते.

जागतिक लोकसंख्या दिवसाच्या निमित्ताने सुधीर यांनी देशाच्या लोकसंख्येत असलेल्या असंतुलनाबाबत आमिरलाच जबाबदार धरले आहे. आमिरवर बोलताना सुधीर गुप्ता म्हणाले, “आजोबा होण्याच्या वयात आमिर आता स्वतःसाठी तिसरी बायको शोधत आहे. आमिरने त्याच्या पहिल्या पत्नीला रीना दत्ताला दोन मुलांसोबत सोडून दिले, किरण रावला एका मुलासोबत सोडले आणि आता आजोबा होच्याण्या वयात तो तिसऱ्या बायकोच्या शोधात आहे. अशा लोकांकडे अंडे विकण्याशिवाय नोकरी करण्यासाठी कोणतेही डोके नाही.” म्हणजेच आमिर खानसारख्या लोकांना नोकरी करण्यासाठी डोके नाहीये ते फक्त अंडे विकू शकतात.

आमिर खाननं त्याच्या दुस-या बायकोला किरण रावला घटस्फोट दिला आहे. या दोघांनी ३ जुलै रोजी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत त्यांचा हा निर्णय जाहीर केला होता. आमिर आणि किरणच्या घटस्फोटची बातमी समोर आल्यानंतर या दोघांचा घटस्फोट हा फातिमा शेखमुळे झाल्याचा अंदाज सोशल मीडिया युझर्सनी लावायला आणि फातिमाला मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केले गेले होते.

किरण रावशी लग्न करायच्या आधी आमिर खानने १९८६ मध्ये रीना दत्तासोबत लग्न केले होते. आमिर आणि रीनाची जुनैद आणि आयरा ही दोन मुले आहेत. रीना आणि आमिर यांचा २००२ मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर आमिरने २००५ मध्ये किरण रावसोबत लग्न केले. या दोघांना सरोगसीचा माध्यमातून एक मुलगा झाला आहे त्याचे नाव आझाद आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-इतिहासातील सोनेरी पान : बाजीप्रभूंच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘पावनखिंड’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीझ

-अली गोनीकडे सध्या नाहीये कोणताच प्रोजेक्ट; वाढलेलं वजन आहे का यामागचं कारण??

-‘मी अंतर्वस्त्र घालायचे की नाही, ही माझी चॉईस…’, कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना हेमांगी कवीने दिली जोरदार चपराक


Leave A Reply

Your email address will not be published.