बॉबी देओल (Bobby Deol) पुन्हा एकदा त्याच्या पडद्यावरच्या अभिनयामुळे चर्चेत आला आहे. सध्या तो त्याच्या ‘लव्ह हॉस्टेल’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी रिलीझ झालेल्या या सिरीजमध्ये तो विक्रांत मेसी (Vikrant Messey) आणि सान्या मल्होत्रासोबत (Sanya Malhotra) दिसत आहे. विशेष म्हणजे, या सिरीजमध्ये तो नकारात्मक भूमिकेत दिसत आहे. मात्र वास्तविक जीवनात तो अगदी साधा आणि सरळ आहे. त्यानेच हा खुलासा केला आहे. त्याच्या सरळपणामुळे लोकांनी त्याच्या कुटुंबाचा कसा फायदा घेतला हेही त्याने सांगितले.
‘लोकांनी घेतला फायदा’
बॉबी देओलने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की, त्याचे वडील धर्मेंद्र (Dharmendra) आणि त्याची आई प्रकाश कौर यांनी त्याला आणि त्याचा मोठा भाऊ सनी देओलला (Sunny Deol) नेहमीच एक चांगला माणूस म्हणून वागवले आणि जगायला शिकवले. सिद्धार्थ कन्ननच्या एका मुलाखतीत, जेव्हा बॉबीला विचारण्यात आले की त्याचे कुटुंब खूप ‘मऊ आणि सौम्य’ आहे, तर कधी त्यांचा गैरफायदा घेतला गेलाय का? याला उत्तर देताना अभिनेता म्हणाला की, “आम्ही खूप सामान्य माणसे आहोत. आम्ही चालढकल किंवा एक्स्ट्रा स्मार्ट नाही, म्हणून लोक आमचा गैरफायदा घेतात.” (bobby deol opens up about his family being very simple says log fayda utha lete hain)
तो पुढे म्हणाला की, “अनेक लोक होते ज्यांना आम्ही मदत केली, त्यांनी आमचा गैरफायदा घेतला आणि आमचे नाव खराब केले आणि पुढे गेले. हे घडत राहते, पण आम्ही चांगले लोक आहोत आणि देव सर्वांवर लक्ष ठेवून आहे. आमच्या आई-वडिलांनी आणि वडीलधाऱ्यांनीच आम्हाला चांगले माणूस व्हायला शिकवले. कारण असे केल्याने जीवनात आपल्याला हवे ते साध्य करता येते.”
बॉबी देओलचे करिअर
बॉबी देओलने १९९५ मध्ये ‘बरसात’ या चित्रपटातून त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तो ‘गुप्त’, ‘सैनिक’, ‘बादल’, ‘बिच्छू’ आणि ‘प्यार हो गया’, ‘अजनबी’, ‘हमराज’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
- जया बच्चन यांनी केली अमिताभ बच्चन यांच्या दाढीची चेष्टा, कधीही न पाहिलेला व्हिडिओ आला समोर
- भाग्यश्रीच्या पतीने मधुचंद्राच्या रातीबद्दल केला मजेशीर खुलासा, सांगितला ‘त्या’ रात्रीचा किस्सा
- भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगने महिला दिनानिमित्त चाहत्यांना दिला महत्त्वाचा संदेश