Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

तर मी शाहिद कपूरच्या कानाखाली लावली असती, कियारा आडवाणीचे धक्कादायक वक्तव्य

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani)अलीकडेच हिंदी चित्रपट निर्माता करण जोहरच्या(Karan Johar) चॅट शो ‘कॉफी विथ करण'(koffe with karan) मध्ये पोहोचली. यावेळी कियारासोबत सुपरस्टार शाहिद कपूरही(Shahid Kapoor) उपस्थित होता. कॉफी विथ करण या शोमध्ये अनेक कलाकार येत असतात आणि ते आपल्या आयुष्यातील अनेक रंजक किस्से सांगत असतात. असाच काहीसा प्रकार कियारा अडवाणीसोबत घडला. कबीर सिंग चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहिद कपूरमुळे तिला ८ तास वाट पाहावी लागल्याचे अभिनेत्रीने सांगितले. 25 फेब्रुवारी 1981 रोजी शाहिद कपुर याचा जन्म झाला. या निमित्ताने त्याच्या चित्रपटाविषयीचे रंजक किस्से जाणुन घेऊ या…

शाहिदमुळे कियाराला 8 तास का थांबावे लागले
शाहिद कपूर यांचा चित्रपट कबीर सिंग बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. कियारा आणि शाहिदचा ‘कबीर सिंग’ हा चित्रपट 2019 मधील हिंदी चित्रपटसृष्टीसाठी सर्वात मोठा हिट ठरला. दरम्यान, शाहिद आणि कियारा ही जोडी हिंदी सिनेमा निर्माता करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये पोहोचली होती. पण शोदरम्यान कियाराने एक गोष्ट सांगितली ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

करणच्या शोमध्ये बिंगो गेम दरम्यान, कियारा आडवाणीने सांगितले की, तिने मनातल्या मनात शाहिद कपूरला कानाखाली लावली. अभिनेत्री पुढे म्हणते ‘शूटिंगचा माझा तिसरा किंवा चौथा दिवस होता आणि पुढच्या सीनसाठी शाहिद कोणते बूट घालणार यावर चर्चा होत असल्याने मला आठ तास वाट पाहण्यास सांगण्यात आले.’

कियाराचा हा किस्सा एकूण करणने तात्काळ कियाराची बाजू घेतली आणि तिचा निर्णय मान्य करत म्हणाला, “बूटावर चर्चा करण्यासाठी मला आठ तास थांबायला सांगितले असते, तर मीही त्याला कानाखाली मारली असती.”

 

View this post on Instagram

 

सिद्धार्थसोबतच्या तिच्या नात्यावर कियाराने उडवाउडवीची उत्तर दिले
शोचा होस्ट करण जोहरने कियाराला बॉलिवूडचा सुपरस्टार सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. कियाराने सांगितले की, या प्रश्नावर तिने नाही पण बोलली नाही आणि हो पण नाही बोलली. पण सिड आणि कियारा एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत याची पुनरावृत्ती नाही. (bollywod kiara advani reveals about 8 hours wait due to shahid kapoor on koffee with karan)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कर
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एकदम जाळच! ‘दंबग गर्ल’ अभिनेत्रीचा बाेल्ड लूक पाहून चाहते घायळ

200 काेटींची फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखर का रडला ढसा ढसा ? एकदा वाचाच

हे देखील वाचा