‘अभिनयात तू बिग बींपेक्षा चांगला’, युजरने असे म्हणताच अभिषेक बच्चननेही दिले त्याच्याच स्टाईलमध्ये उत्तर; म्हणाला…

bollywood abhishek bachchan responds twitter user who said he is better than dad amitabh


अभिषेक बच्चन अशा बॉलिवूड कलाकारांपैकी एक आहे, जे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. सक्रिय असण्यासोबतच, तो युजर्सच्या कमेंट्सला प्रत्युत्तरही देत असतो. ‘रिफ्यूजी’ चित्रपटाने कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या अभिषेक बच्चनने आपल्या कारकीर्दीत आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अलीकडेच एका युजरने त्याला त्याचे वडील आणि ‘महानायक’ अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा चांगला अभिनेता म्हणून ट्वीट केले होते. मात्र, यावर एक उत्तम उत्तर देत, त्याने युजरचे आभार मानले.

अभिषेक बच्चनला कित्येकदा ट्रोल केले जाते. वडील म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्यामुळेच त्याला चित्रपटांमध्ये काम मिळत आहे, असे सोशल मीडियावर नेहमी बोलले जाते. प्रेक्षक अभिषेकच्या अभिनय आणि चित्रपटाची तुलना नेहमी अमिताभ यांच्यासोबत करतात. नुकताच अभिषेक ‘द बिग बुल’ या चित्रपटात दिसला होता. यासाठी त्याचे खूप कौतुकही झाले.

एका युजरने ट्विटरवर लिहिले की, “बिग बुलला पाहून मला वाटते की, अभिनयाच्या बाबतीत तू बिग बींपेक्षा चांगला आहेस. धन्य गुरु भाई.” युजरने अशाप्रकारे अभिषेकचे कौतुक केले. पण अभिषेकने त्याला त्याच्याच स्टाईलमध्ये उत्तर दिले आहे. या ट्वीटचे उत्तर देत अभिषेकने लिहिले की, “तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल धन्यवाद सर. पण त्यांच्यापेक्षा उत्तम कोणीही असू शकत नाही.”

अभिषेकच्या या उत्तराने सर्वांचे मन जिंकले आहे. चाहते त्याचे खूप कौतुक करत आहेत. तसेच, असे अनेक प्रसंग आले आहेत, जेव्हा अभिषेकने आपल्या वडिलांचे उघडपणे कौतुक केलेले पाहायला मिळाले.

‘द बिग बुल’ या चित्रपटात अभिषेकने स्टॉक ब्रोकर हर्षद मेहताची भूमिका साकारली होती. यामधील अभिषेकच्या कामाची खूप प्रशंसा केली जात आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अभिषेक आता ‘दसवीं’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय त्याच्याकडे ‘बॉब विश्वास’ आणि ‘ब्रीथ’ सारखे अनेक महत्त्वाचे प्रकल्प आहेत, ज्यावर तो सतत काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तू एक हिरो आहेस’, अभिनेत्री सारा अली खानने केलेल्या ‘या’ कामामुळे सोनू सूदेकडून प्रशंसा

-ढोल ट्विस्टसोबत व्हायरल झाले रवीना टंडनचे ‘टिप टिप बरसा पाणी’ गाणे, अभिनेत्रीनेही व्हिडिओ केला शेअर

-श्वास रोखून धरा! तब्बल १०० कोटी रुपये घेत साऊथ सुपरस्टार ‘विजय देवरकोंडा’ करणार बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री


Leave A Reply

Your email address will not be published.