Thursday, November 30, 2023

बॉलीवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने ऐश्वर्याचा अपमान करून केलेली मोठी चूक, प्रकरण वाढल्यावर मागितली माफी

बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नुकतीच साऊथच्या ‘पोनियिन सेल्वन‘ चित्रपटाच्या पार्ट 1 मध्ये दिसली. या चित्रपटाद्वारे ऐश्वर्याने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने लोकांना पुन्हा वेड लावले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. पण, तुम्हाला माहिती आहे का की, काही वर्षांपूर्वी या विश्वसुंदरीला बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याकडून खूप काही ऐकायला मिळाले हाेते. मात्र, नंतर हे प्रकरण इतके वाढले की, या अभिनेत्याला ऐश्वर्या रायची माफी मागावी लागली, चला तर मग जाणून घेऊया कोण आहे ताे प्रसिद्ध अभिनेता?

हा अभिनेता दुसरा कोणी नसून इमरान हाश्मी (emraan hashmi ) होता. खरं तर, काही वर्षांपूर्वी इम्रान करण जोहरच्या प्रसिद्ध सेलिब्रिटी चॅट शोमध्ये दिसला होता, जिथे त्याने ऐश्वर्या राय हिच्या विषयी सांगितले की, “तिला तो ‘बनावट’ आणि ‘प्लास्टिक’ वाटतो.” इम्रानच्या या गोष्टीचा मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार झाला आणि सोशल मीडियावरही लोकांनी त्याच्यावर टीका केली. त्यामुळे इम्रानला बरंच काही ऐकायला मिळालं. माध्यमातील वृत्तानुसार, जेव्हा हे प्रकरण खूप पुढे गेले तेव्हा त्याने जाहीरपणे एक वक्तव्य जारी करून आपले स्पष्टीकरण देताना ऐश्वर्याची माफी मागितली.

त्यावेळी माध्यमाशी झालेल्या संवादात इम्रानने सांगितले होते की, “मी हे वक्तव्य केवळ शोमध्ये हॅम्पर जिंकण्यासाठीच केले हाेते. मी स्वतः ऐश्वर्याचा खूप मोठा चाहता आहे आणि मला ती खूप आवडते.” इमरान पुढे म्हणाला की, “मलाही तिचे काम आवडते. या विधानावरून गदारोळ होणार हे मला माहीत होते, पण लोकांचे काय, ते सर्वच गोष्टींवर गदारोळ करतात.”

इमरान हाश्मीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, इमरान हाश्मी लवकरच बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खानसोबत त्याचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘टायगर 3’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा सलमान आणि कॅटरिना कैफची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे.(bollywood actor emraan hashmi when made big mistake by insulting actress aishwarya rai bachchan publicly later apologizes know whole matter)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मी माजोरी नाही…’, तेजस्विनी पंडितचे निर्मिती क्षेत्राबद्दल मोठे वक्तव्य

साउथ विरुद्ध बॉलिवूडविषयी रोहित शेट्टीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘आमचेच नाही, त्यांचेही…’

हे देखील वाचा