Tuesday, May 21, 2024

अरे वाह! ऋतिक अन् सबाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, लवकरच अडकणार…

बॉलिवूडचा लाेकप्रिय अभिनेता ऋतिक रोशन अनेकदा त्याची गर्लफ्रेंड सबा आझादसोबत स्पॉट केला जातो. दोघेही एकमेकांबद्दल खूप सीरियस आहेत. ऋतिक रोशन आणि सबा आझाद गेल्या काही काळापासून एकत्र राहण्याचा विचार करत आहेत. अशातच त्यांच्याबद्दल एक नवीन अपडेट समाेर येत आहे, ज्यामुळे ते प्रचंड चर्चेत आले आहे. काय आहे नेमके प्रकरण चला जाणून घेऊया…

अभिनेता ऋतिक रोशन (rithik roshan) आणि सबा आझाद (saba azad) यांचे रिलेशनशिप जगजाहीर आहे. सोशल मीडियावरही दोन्ही स्टार्स एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. एकमेकांचे फोटो शेअर करून दोघेही त्यांच्या लव्ह लाईफचे प्रत्येक अपडेट चाहत्यांना देत असतात. या कपलच्या ट्विनिंग आउटफिटचीही अनेकदा चर्चा होते. आता त्यांच्या नात्याबद्दल एक नवीन अपडेट समोर आले आहे.

माध्यमातिल वृत्तानुसार, ऋतिक रोशन आणि सबा आझाद आता एकत्र राहणार आहेत. दोघेही मुंबईतील मन्नत अपार्टमेंटमध्ये एकत्र राहण्याचा विचार करत आहेत. इमारतीच्या वरच्या दोन मजल्यांवर सध्या काम सुरू आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर दोघेही लवकरच तिथे शिफ्ट होऊ शकतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saba Azad (@sabazad)

अलीकडेच ऋतिक रोशनने सुमारे 100 कोटी रुपयांचे दोन अपार्टमेंट खरेदी केल्याची बातमी आली होती. ऋतिक रोशनने या तीन मजली अपार्टमेंटमध्ये दोन वरचे मजले 97.50 कोटींना खरेदी केले होते. हे अपार्टमेंट अरेबियन सी व्ह्यू आहे. सबा आणि ऋतिक 38 हजार स्क्वेअर फूटमध्ये बनवलेल्या या अपार्टमेंटमध्ये आपले एक छाेटीशी दुनीया बनवणार आहेत.

ऋतिकच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तो लवकरच ‘फाइटर’मध्ये दिसणार आहे. सध्या ताे या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोणही दिसणार आहे. ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोण हे पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट 25 जानेवारी 2024ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. (bollywood Actor hrithik roshan and saba azad plan to take their relationship forward preparing to live in)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
धक्कादायक! अभिनेत्री नीना गुप्ता यांची प्रकृती खालावली, चाहत्यांनी लवकर बरे हाेण्यासाठी केली प्रार्थना

सुंबूलला शालीनचे वेड; सलमान खानने रागवल्यानंतर ढसाढसा रडत ‘इमली’ म्हणाली, ‘मला घरी…’

हे देखील वाचा