लईच वाईट झालं! कार्तिक आर्यनच्या आजोबांचे निधन, फोटो शेअर करत म्हणाला, ‘एकेदिवशी मी…’


बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून जणू सातत्याने वाईट बातम्या येत आहेत. दिलीप कुमार, वीर चोप्रा, स्नेहलता पांडे यांसारख्या दिग्गज कलाकारांचे नुकतेच निधन झाले. आता आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. रविवारी (११ जुलै) बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या आजोबांचे निधन झाले आहे. त्यामुळे आता कार्तिकवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यासोबतच त्याने आपल्या आजोबांसारखं बनण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.

कार्तिकने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या आजोबांसोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोत चिमुकला कार्तिक आपल्या आजोबांच्या कुशीत बसलेला दिसत आहे. फोटोत कार्तिकचे वय केवळ एक किंवा दोन असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे त्याच्या आजोबांनी सूट परिधान केला आहे आणि कार्तिक लाल रंगाच्या स्वेटरमध्ये दिसत आहे. (Bollywood Actor Kartik Aaryan Grandfather Passed Away Celebs Offer Condolences To The Actor)

हा फोटो शेअर करून त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आशा आहे की, एकेदिवशी मी तुमच्यासारखा बनू शकेल. तुमच्या आत्म्याला शांती मिळो आजोबा.” कार्तिकच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच त्याचे मित्रही सांत्वन करत आहेत. सोबतच त्याच्या आजोबांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी प्रार्थनाही करत आहेत.

कार्तिक आर्यनच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो लवकरच हॉरर कॉमेडी चित्रपट ‘भूल भुलैया २’मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा आडवाणी, परेश रावल, राजपाल यादवही दिसणार आहेत. हा चित्रपट सन २००९ साली आलेल्या अक्षय कुमारच्या चित्रपटाचा सिक्वल आहे. याव्यतिरिक्त कार्तिक आर्यनने नुकतीच एका चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘सत्यनारायण की कथा’ या नावाने बनल्या जाणाऱ्या चित्रपटाचे नाव लवकरच बदलण्यात येणार आहे.

कार्तिक हा मध्यप्रदेशच्या ग्वालियर जिल्ह्यातील रहिवासी आहे. कार्तिक आर्यनचे पूर्ण नाव कार्तिक आर्यन तिवारी आहे. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी त्याने आपले नाव कार्तिक आर्यन ठेवले होते. कार्तिकच्या वडिलांचे नाव मनीष तिवारी आहे, तर तिच्या आईचे नाव माला तिवारी आहे. कार्तिकला एक बहीणही आहे. तिचे नाव कृतिका तिवारी असून ती डॉक्टर आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खेसारी लाल यादवच्या ‘या’ गाण्यावर अभिनेत्री राणीने लावले जोरदार ठुमके; दिलखेचक अदांना चाहत्यांची पसंती

-पती राज कौशल यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच घराबाहेर दिसली मंदिरा बेदी, आईसोबतचा व्हिडिओ तुफान व्हायरल

-‘…ती सई चोर आहे’, म्हणत मोठ्या बहिणीच्या व्यथा मांडताना दिसली मृण्मयी; सोबतच गौतमीवर लावले तिने गंभीर आरोप


Leave A Reply

Your email address will not be published.