कार्तिक आर्यनने हटके अंदाजात साजरा केला ‘रोझ डे’, अवघ्या २ दिवसांत व्हिडिओला ३० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज

Bollywood Actor Kartik Aryan Celebrates Rose Day In This Style Shared Video On Social Media


बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. तो नेहमीच आपले नवनवीन फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. नुकताच रोझ डे झाला. यानिमित्ताने तो हा दिवस सेलिब्रेट करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये कार्तिक कोणत्यातरी शॉपिंग मॉलमध्ये असल्याचे दिसत आहे. तसेच त्याला तिथे एक लहान मुलगी गुलाब देताना दिसत आहे. मुलीचा दयाळूपणा पाहत कार्तिक हसून तिच्याकडून गुलाब घेतो. त्यानंतर त्या मुलीसोबत फोटोही काढतो.

या व्हिडिओमध्ये कार्तिक रंगीत टी-शर्टसह जॅकेट घातलेला दिसत आहे. हा व्हिडिओ त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत त्याने लिहिले की, “असा ‘रोझ डे’ रोज-रोज यावा.”

नुकतेच कार्तिक आपल्या आगामी ‘धमाका’ चित्रपटाच्या फीबद्दल चर्चेत होता. असे म्हटले जात आहे की, कार्तिकने या चित्रपटाचे चित्रीकरण अवघ्या १० दिवसांमध्ये पूर्ण केले होते आणि यासाठी त्याने तब्बल २० कोटी रुपये घेतले आहे.

माध्यमांतील काही वृत्तांनुसार, कार्तिकला या चित्रपटाच्या शूटिंगसाठी १४ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. परंतु त्याने शूटिंग १० दिवसांमध्येच पूर्ण केली. चित्रपटाचा अधिक भाग हा इनडोअर शूट केला आहे.

या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यनने एका पत्रकाराची भूमिका साकारली आहे. याची माहिती त्याने आपल्या वाढदिवशी चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करत दिली होती. या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे की, टीव्ही चॅनेलमध्ये कशाप्रकारे काम चालते आणि विशेषत: लाईव्ह कव्हरेज दरम्यान न्यूज रूममधील वातावरण कसे असते.

याव्यतिरिक्त कार्तिक आर्यन ‘भूल भुलैय्या २’ आणि ‘दोस्ताना २’ या चित्रपटांसाठीही चर्चेत आहे. दोस्ताना २ मध्ये तो जान्हवी कपूरसोबत दिसणार आहे. नुकतेच त्याला आणि जान्हवी कपूरला एकत्र गोव्यावरून परतताना मुंबई विमानतळावर पाहिले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

‘भाऊ, तेवढंच काम राहिलंय आता…’, सोनू सूदकडे चाहत्याने केली अशी तक्रार की अभिनेत्याने तिथेच जोडले हात
द लेजेंड हनुमान  सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित, जाणून घ्या कोणता रोल निभावतो मराठमोळा शरद केळकर?
तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरतंय स्पेलंडर  गाणं, रिलीज झाल्यापासून चार दिवसांत मिळालेत लाखो हिट्स
गुरु रंधावाच्या या गाण्याचा मेकिंग व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ; हिट्स लाखोंच्या घरात
प्रीती झिंटाच्या  बुमरो बुमरो  गाण्यावर काश्मिरमध्येच थिरकली शहनाज गिल, व्हिडीओने सोशल मीडियावर मिळविल्या लाखो हिट्स


Leave A Reply

Your email address will not be published.