Thursday, July 18, 2024

दिवाळी पार्टीत दिसले नाही दीपिका अन् रणवीर, पुन्हा उडू लागल्या विभक्त होण्याच्या अफवा!

देशभरात सर्वत्र दिवाळी साजरी होत आहे. प्रत्येकजण आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत दिवाळी पार्टी करत आहे, त्यामुळे बॉलिवूडही या बाबतीत मागे नाही. सेलेब्स सतत पार्ट्या करत असतात आणि त्यांच्या फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला असतो. पण या दिवाळी पार्ट्यांमुळे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यासोबतच त्यांच्या विभक्त होण्याच्या अफवांनाही प्रचंड वेग आला आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

बॉलिवूडमधील पार्ट्यांमध्ये फिल्मी दुनियेतील सर्व सेलिब्रिटी हजेरी लावत आहेत. मात्र, दीपिका पदुकोण (deepika padukone) आणि रणवीर सिंग (ranveer singh) आतापर्यंत झालेल्या पार्ट्यांमध्ये कुठेही दिसले नाहीत, त्यामुळे या जोडप्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याचवेळी त्यांच्या गैरहजेरीमुळे त्याचे चाहतेही निराश झाले आहेत. बी टाऊनच्या दिवाळी पार्टीत चाहते रणवीर आणि दीपिकाला खूप मिस करत आहेत.

काही दिवसांपूर्वी दीपिका आणि रणवीरच्या विभक्त होण्याच्या अफवांनाही प्रचंड वेग आला हाेता, परंतु या जोडप्याने या अफवांवर चाैख उत्तर देत हे थांबवले हाेते. मात्र, आता दिवाळी पार्टीत रणवीर आणि दीपिकाच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा एकदा अफवांना वेग आला आहे. नुकतेच निर्माता रमेश तौरानी, ​​डिझायनर मनीष मल्होत्रा, आनंद पंडित, क्रिती सेनॉन, भूमी पेडणेकर यांसारख्या अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये बॉलिवूडचे जवळपास सर्व स्टार्स उपस्थित होते. मात्र, दीपिका आणि रणवीर प्रत्येक पार्टीला अनुपस्थित होते.

माध्यमांतील वृत्तानुसार, दीपिका आणि रणवीरने त्यांच्या नात्यातील खट्टूपणा पूर्णपणे नाकारला आहे. त्याच वेळी, हे दोघेही आपापल्या कामात व्यस्त असल्याने काेणत्याही पार्टीत हजेरी लावू शकले नाहीत. रणवीर सध्या कामानिमित्त मुंबईबाहेर आहे. तर दीपिका पदुकोणही तिच्या शूटिंगवर लक्ष केंद्रीत करत आहे.

रणवीर आणि दीपिकाची जोडी शेवटची ‘पद्मावत’ चित्रपटात एकत्र दिसली होती. मात्र, प्रेक्षकांना ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायची आहे. त्याचबरोबर रणवीरनेही दीपिकासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे रणवीर आणि दीपिका त्यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत. रणवीर रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ चित्रपटामध्ये तर दीपिका शाहरुखसोबत ‘पठाण’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
अमृता फडणवीसांचे नवीन गाणं प्रेक्षाकांच्या भेटीला, दिवाळीनिमित्त भक्तीत झाली तल्लीन

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर ‘या’ दिवशी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार ‘ब्रह्मास्त्र’

हे देखील वाचा