Tuesday, May 21, 2024

ब्रेकअपच्या अफवांनंतर टायगर अन् दिशाचा फ्लाइटमधील ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल, एकदा पाहाच

बाॅलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी पहिल्यांदाच त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनंतर एकत्र दिसले. खरे तर, नुकतेच दोघांनीही एकाच फ्लाइटमधून मुंबई ते दिल्ली असा प्रवास केला. टायगर आणि दिशा एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दिल्लीत पोहोचले होते, जिथे ते एकत्र बसलेले दिसले. दोघांचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ते एकमेकांशी बोलताना दिसत आहेत.

इव्हेंटमधून समोर आलेल्या व्हिडीओ आणि फाेटाेंमध्ये टायगरजवळ दिशा व्यतिरिक्त, त्याची बहीण कृष्णा श्रॉफ देखील बसलेली दिसत आहे आणि त्याच्या मागे त्याची आई आयशा श्रॉफ बसली आहे. डॅनी डेन्झोंगपा यांचा मुलगा रिंगजिंग डेन्झोंगपाही त्याच्यासोबत दिसत आहे. मंडळी, यापूर्वी एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये दिशा आणि टायगर फ्लाइटमध्ये एकत्र प्रवास करताना दिसत होते.

फ्लाइटमध्ये दिशा रिंगजिंग रेकॉर्ड करताना दिसत आहे आणि टायगर तिच्या समोर बसलेला आहे, ज्यामध्ये टायगरची फक्त एक झलक दिसते. यानंतर टायगर आणि दिशा दिल्लीहून परतताना मुंबई विमानतळावर एकत्र दिसले, ज्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. यादरम्यान दिशा चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसली, तर टायगरही तिची वाट पाहत होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

काही दिवसांपुर्वी टायगर आणि दिशाच्या अफेअरच्या अफवा चर्चेचा भाग होत्या. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. हे दोघे अनेकदा वीकेंडला रेस्टॉरंटच्या बाहेर एकत्र दिसले. मात्र, तरीही दाेघांनी त्यांच्या नात्याची जाहीरपणे पुष्टी केली नाही. काही दिवसांपुर्वीच या दाेघांच्या ब्रेकअप झाल्याच्या अफवा देखील चर्चेत हाेत्या.(bollywood actor tiger shroff disha patani spotted together after breakup rumors attended event videos viral)

अधिक वाचा- 
साेनम लंडनच्या रस्त्यावर दिसली वायुसाेबत फिरताना, अभिनेत्रीने शेअर केले गोंडस फोटो
‘आता खा आणि ओका…’, राज्यातील राजकीय भूकंपाबद्दल तेजस्विनी पंडितचं ट्वीट चर्चेत; लगेच वाचा

हे देखील वाचा