Tuesday, October 15, 2024
Home बॉलीवूड वरुण-जान्हवी स्टार ‘बवाल’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, प्रेक्षकांना पाहायला मिळणार प्रेमकथेसह ट्विस्ट

वरुण-जान्हवी स्टार ‘बवाल’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, प्रेक्षकांना पाहायला मिळणार प्रेमकथेसह ट्विस्ट

वरुण धवन आणि जान्हवी कपूर स्टारर ‘बवाल‘चा बहुप्रतिक्षित ट्रेलर लाँच झाला आहे. दुबईतील एका कार्यक्रमादरम्यान हा ट्रेलर लोकांसमोर सादर करण्यात आला. या चित्रपटात वरुण धवन आणि जान्हवी पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर खूपच प्रेक्षणीय आहे. या ट्रेलरमध्ये दोघांची जोडी खूपच छान दिसत आहे. हा चित्रपट युद्धाच्या ब्रॅकड्रॉपवर विनलेला आहे.

अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या अधिकृत सोशल मीडियावरील अकाऊंटवरून शेअर केलेल्या तीन मिनिटे आणि तीन सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये वरुण (varun dhawan) आणि जान्हवी (jhanvi kapoor) हिची केमिस्ट्री खूपच छान दिसत आहे. याचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे. हा चित्रपट दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित लव्हस्टाेरी आहे.

प्राइम व्हिडिओने ट्विटरवर ‘बवाल’चा ट्रेलर शेअर केला आहे. यासोबत, कॅप्शनमध्ये लिहिले की, “प्रेम ते बवालपर्यंतचा प्रवास!” चित्रपटामध्ये असेल. यासह या ठिकाणी प्रदर्शित होणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरेल.

जान्हवी कपूर आणि वरुण पहिल्यांदाच या चित्रपटाद्वारे स्क्रिन शेअर करणार आहेत. चित्रपटात वरुण धवन एका इतिहास शिक्षकाची भूमिका साकारत आहे, जो विद्यार्थ्यांना चुकीचा इतिहास शिकवतो, ज्यामुळे नंतर गोंधळ होतो. अशात हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्साही आहेत.(bollywood actor varun dhawan jhanvi kapoor nitesh tiwari bawaal trailer released )

अधिक वाचा-
‘अशोक सराफ यांची चालू प्रयोगात घसरली पॅन्ट अन्…’, वाचा नेमक काय आहे ‘तो’ किस्सा

कपाळावर भस्म, गळ्यात रुद्राक्षाची माळ अन् जटाधारी अवतारात दिसला अक्षय, युजर्सने दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा