Tuesday, April 23, 2024

जान्हवीने उर्फीला टाकले मागे! अभिनेत्रीचा बाेल्ड ड्रेसमधील हाॅट लूक पाहून नेटकरी अवाक्; कमेंट करत म्हणाले…

चित्रपट निर्माता बोनी कपूरची लाडकी लेक जान्हवी कपूर नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. चाहत्यांना तिच्या बोल्ड आणि हॉट लूक प्रचंड आवडताे. अशात अलीकडेच जान्हवीचा एक व्हिडिओ समाेर आला आहे, जाे साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला, जाणून घेऊया…

जान्हवी कपूर (janhvi kapoor) नुकतीच एका अवॉर्ड नाईटमध्ये सहभागी झाली होती, ज्यामध्ये ती थाई-हाय स्लिट बॅकलेस ड्रेस परिधान करून पोहोचली होती. ड्रेसला कमरेच्या दोन्ही बाजूंना कट होता. तसेच समोरच्या बाजून देखील एक कट होता. याशिवाय बॅकलेस ड्रेसच्या मागील बाजूस अनेक स्ट्रिप्स होत्या, ज्याला खालच्या बाजूने कट होता. या बोल्ड ड्रेसमुळे जान्हवी खूपच हॉट दिसत होती.

जान्हवीच्या या लूकचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कारण, सोशल मीडिया युजर्स अभिनत्रीला खूप ट्रोल करत आहेत. या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, ‘उर्फीपासून प्रेरणा घ्या’ ,तर दुसर्‍याने लिहिले, ‘गुपचूप आता सर्वांना उर्फीची प्रेरणा मिळत आहे.’ अशात एका युजरने लिहिले की, ‘मला वाटले ती उर्फी आहे.’ त्याचवेळी, ‘प्रत्येकाने उर्फीसारखे बनले पाहिजे’, अशी कमेंट ट्राेल करत केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

जान्हवी करणार तेलुगु फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण
जान्हवी कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे, झाले तर जान्हवी लवकरच वरुण धवनच्या विरुद्ध ‘बवाल’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय जान्हवी ‘मिस्टर अँड मिसेस माही’मध्येही राजकुमार रावच्या विरुद्ध भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच जान्हवी ज्युनियर एनटीआर सोबत तेलुगु फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे.(bollywood actress janhvi kapoor trolled on social media for wearing green backless thigh high slit dress )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
समंथा रुथ प्रभूची दहावीची मार्कशीट झाली व्हायरल, गणिताचे आकडे पाहून तुम्ही व्हाल थक्क
आमिर खानने पीएम मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे केले कौतुक; म्हणाला, ‘देशाच्या लोकांना…’

हे देखील वाचा