अरेरे! मीडियासमोरच ओपन झाला होता जॅकलिनचा ड्रेस, सोनम कपूरने ‘अशाप्रकारे’ वाचवली होती तिची इज्जत

Bollywood Actress Sonam Kapoor Helps out Jacqueline Fernandez During Wardrobe Malfunctioning In An Event


जीवनात काळानुसार बदलणारी स्टाईल अंगीकारताना आपण अनेकांना पाहतो. अगदी असंच बॉलिवूडच्या कलाकारांबाबतही घडताना दिसते. बॉलिवूडच्या अभिनेत्रींची स्टाईल तर प्रेक्षकांमध्ये ट्रेंड बनलेली असते. फॅशनच्या बाबतीत प्रत्येक अभिनेत्रीला स्वत:ला इतर अभिनेत्रींपेक्षा सर्वोत्तम सिद्ध करायचे असते. तसं पाहिलं, तर अनेक अभिनेत्री लहान मोठ्या कार्यक्रमांना खास डिझाईन केलेले कपडे परिधान करतात.

अशावेळी स्टाईलची स्पर्धा इतकी जबरदस्त असते की, लहान चुकीमुळेही त्यांना लाजिरवाण्या गोष्टीचा सामना करावा लागतो. असंच काहीसं प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत घडलं होतं, त्यावेळी अभिनेत्री सोनम कपूरने तिची इज्जत वाचवली होती.

खरंतर एका कार्यक्रमादरम्यान जॅकलिन फर्नांडिसनेही हजेरी लावली होती. यादरम्यान तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. परंतु चालताना अचानक तिचा ड्रेस मागून उघडला जातो. विशेष म्हणजे, मीडिया तिच्या मागे नसून समोर होती. तिला जाणवले की, तिच्या ड्रेसमध्ये काहीतरी गडबड झाली आहे. अशामध्ये ती खूप चिंतेत होती. परंतु त्याचवेळी जेव्हा सोनम कपूरला हे समजले, तेव्हा ती पाठीमागून जॅकलिनच्या जवळ पोहोचली.

सोनमने अत्यंत समंजस्यपणे ती परिस्थिती सांभाळली आणि फोटोग्राफरसमोरच तिचे कपडे ठीक करू लागली. यादरम्यान जॅकलिन आणि सोनमने हटके पोज देत फोटो काढले. त्यानंतर सोनमने जॅकलिनचा ड्रेस लगेच व्यवस्थित केला आणि तिची इज्जत जाण्यापासून तिला वाचवले.

सोनम कपूरच्या या समंजस्यपणाची सर्वांना प्रशंसा केली. सोबतच सोनमच्या या कृत्यामुळे जॅकलिनला व्यवस्थित वावरता आले. खरं तर सोनम आणि जॅकलिन या चांगल्या मैत्रिणी आहेत. सोबतच या दोघींनाही फॅशनची चांगली जाण आहे.

जॅकलिनने सन २००९ साली ‘अलादिन’ या चित्रपटातून अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती. यानंतर तिने ‘मर्डर २’, ‘हाऊसफुल २’, ‘रेस २’, ‘हाऊसफुल ३’, ‘बाघी २’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता! रवीना टंडनचा नवरा होता फराह खानचा स्लीपिंग पार्टनर, ‘या’ कारणामुळे दोघे झोपायचे एकाच बेडवर
-इंजिनीअरिंग केल्यानंतर वळला होता मॉडेलिंगकडे, कष्ट करून मिळवली लोकप्रियता, वाचा संदीप नाहरचा संघर्षमय प्रवास
-‘आपण दोघी जॅकीसोबत लग्न करू आणि बहिणीसारख्या राहू’, जॅकी श्रॉफ यांच्या बायकोने त्यांच्या गर्लफ्रेंडला लिहिले होते पत्र, वाचा तो किस्सा
-ऋषी कपूर यांच्यासोबत पदार्पण केलेल्या ‘या’ अभिनेत्रीला, ‘हम पांच’ने दिली खरी ओळख, वाचा तिच्या प्रवासाबद्दल
-याला म्हणतात खरे प्रेम! ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने चाहत्याने उभारले ‘या’ अभिनेत्रीचे मंदिर, घातला दुधाने अभिषेक


Leave A Reply

Your email address will not be published.