बापरे बाप…! उर्वशी रौतेलाने नेसली तब्बल ‘इतक्या’ लाखांची पटोला साडी; म्हणाली, ‘३०० वर्षांपर्यंत नाही होत खराब’


बॉलिवूड अभिनेत्रींना आपण नेहमीच हटके आणि ग्लॅमरस अंदाजातील कपडे घातलेले नेहमीच पाहत असतो. मात्र, हटके आणि ग्लॅमरस अंदाजातील याच अभिनेत्री जेव्हा साडी नेसतात, तेव्हा त्यांच्यावरील नजर हटवणे नक्कीच कठीण होते. असेच एका बॉलिवूड अभिनेत्रीने साडी नेसून पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. ही अभिनेत्री इतर कोणी नसून, सौंदर्यवती उर्वशी रौतेला आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिला इंस्टाग्रामवर ३८. २ मिलियनपेक्षाही अधिक फॉलोवर्स आहेत. आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत उर्वशी चाहत्यांशी संपर्क साधत असते. अशातच आता तिने पारंपारिक लूकमधील फोटो शेअर करून सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडले आहे. (Bollywood Actress Urvashi Rautela Bridal Look Photos Went Viral On Internet)

उर्वशीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर आपले पारंपारिक पोशाखातील फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने गुजराती साडी नेसली आहे. तिने रंगीत साडी आणि निळ्या रंगाच्या ब्लाऊजचे कॉम्बिनेशन कमालीचे दिसत आहे. या फोटोत ती एका नवरीप्रमाणे सजली आहे.

उर्वशीच्या या साडीचे विशेष म्हणजे, तिने नेसलेल्या या साडीची किंमत जवळपास ५८ लाख रुपये असल्याचे म्हटले जात आहे. ही साडी नेसून तिने अभिनेते मनोज कुमार यांची नात मुस्कानच्या मेहंदी समारंभाला हजेरी लावली आहे.

उर्वशीने आपले देखणे फोटो शेअर करत हटके कॅप्शन दिले आहे. आपल्या पहिल्या फोटोला कॅप्शन देत उर्वशीने लिहिले की, “ही केवळ मेहंदी नाही, तुझ्या प्रेमाचा रंग चढला आहे. आता हा रंग आयुष्यभर जाणार नाही, हीच प्रार्थना करते.”

याव्यतिरिक्त उर्वशीने आपल्या दुसऱ्या फोटोला कॅप्शन देत लिहिले की, “ज्याप्रकारे माझ्या श्वासावर तुझे प्रेम आहे, तसाच माझ्या हातावर मेहंदीचा रंग उमटला आहे.”

यासोबतच तिने या क्लासिक पटोला साडीतील व्हिडिओही शेअर केला आहे. यामध्ये तिने सांगितले आहे की, ही साडी तब्बल ३०० वर्षांपर्यंत खराब होत नाही.

उर्वशीच्या या फोटोंना चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. ५ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स तिच्या फोटोंना मिळाले आहेत. चाहत्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वजण तिच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

उर्वशीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती ‘ब्लॅक रोज’, ‘थ्रीतूत्तु पायले 2’ आणि वेब सीरिज ‘इन्स्पेक्टर अविनाश’ यामध्ये दिसणार आहे. तिने सन २०१३ साली आलेल्या ‘सिंग साहब द ग्रेट’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यामध्ये तिच्यासोबत सनी देओलही मुख्य भूमिकेत दिसला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘…नैणा ठग लेंगे’, म्हणत प्रार्थना बेहेरेच्या नजरेने केला चाहत्यांच्या हृदयावर वार; ग्लॅमरस फोटो होतायेत व्हायरल

-नववारी साडीमध्ये खुललं अपूर्वा नेमळेकरचं सौंदर्य; तर कॅप्शननेही वेधलं अनेकांचं लक्ष

-स्पृहा जोशीचे लाजने पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका; व्हिडिओवर पडतोय लाईक्सचा पाऊस


Leave A Reply

Your email address will not be published.