‘बॉलिवूड सोडूनही जग आहे’, म्हणत अभिनयात येणार असल्याच्या चर्चांना कृष्णा श्रॉफने लावला पूर्णविराम


सोशल मीडियामुळे कलाकार तर कलाकार त्यांचे कुटुंबीय आणि अगदी सामान्य माणसं देखील सेलेब्रिटी झाले आहेत. या सोशल मीडियामुळे कलाकारांचे कुटुंब देखील लाइमलाईट्मधे येते. बॉलिवूडचा जग्गू दादा अर्थात सर्वांचा लाडका जॅकी श्रॉफ सध्या मोजक्याच चित्रपटांमध्ये दिसत असला तरी आता त्याचा मुलगा टायगर श्रॉफ बॉलिवूड गाजवताना दिसत आहे. तर दुसरीकडे त्याची मुलगी कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय होत आहे.

कृष्णा श्रॉफ नेहमी तिच्या फिटनेससाठी, बोल्ड आणि बिनधास्त फोटोंमुळे ओळखली जाते. जॅकी श्रॉफ यांनी त्यांचा काळ त्यांच्या अभिनयाने जोरदार गाजवला. आता त्यांचा मुलगा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये आला मात्र त्यांची मुलगी कृष्णा कधी चित्रपटांमध्ये दिसेल असा प्रश्न नेहमीच तिच्या फॅन्सला पडत असतो. तिला सोशल मीडियावर अनेकदा विचारले देखील जाते. मात्र कृष्णाने कधीच यावर मनमोकळे उत्तर दिले नाही. मात्र नुकताच तिने तिच्या सिनेमांमधील पदार्पणाबद्दल खुलासा केला आहे.

कृष्णा एक फिटनेस एक्सपर्ट आहे. नेहमी नेहमी विचारण्यात येणाऱ्या अभिनयात येण्याच्या प्रश्नावर कृष्णाने उत्तर देताना म्हटले, “खरं सांगायचे तर लोकं नेहमी अभिनयाच्या किड्याबद्दल बोलताना दिसतात. मात्र मला या किड्याने कधी चावलेच नाही. मी माझ्यासाठी जो मार्ग निवडला आहे, त्यात मी खुच संतुष्ट आणि आनंदी आहे. मी माझ्या पद्धतीने माझा मार्ग बनवू इच्छिते. माझ्याकडे आतापर्यंत अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या. त्या सर्व मी नाकारल्या आहेत. या ऑफर नाकारण्यामुळे मला कोणताच पश्चाताप होत नाहीये.

पुढे कृष्णा तिच्या फिटनेसबद्दल असलेल्या पॅशनबद्दल बोलताना म्हणाली, “मी नेहमीच सांगते की फिटनेस हा आपला वर्तमान तर आहेच सोबत भविष्य देखील आहे. हे क्षेत्र फक्त भारतात नव्हे तर संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. जर तुम्ही लोकांना फिटनेसबाबत जागृत करत असाल तर तुम्ही त्यांच्या आयुष्यासाठी एक अनमोल भेटच देत आहात.”

नुकताच कृष्णाला तिच्या फिटनेसबद्दल एका पुरस्कारने सन्मानित देखील करण्यात आले त्याबद्दल तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटले होते की, “अशा करते की आता मला अभिनेत्री होण्याबद्दल कोणी विचारणार नाही. माझे उत्तर आजही ‘नाही’ असेच आहे. मी इंस्टावर जास्त लिहीत नाही, मात्र ही गोष्ट सांगणे मला आवश्यक वाटले.”

कृष्णाला सतत विचारल्या जाणाऱ्या या प्रश्नामुळे तिला काय वाटते याबद्दल ती सांगते, “मला जेव्हा हा एकच प्रश्न सतत विचारला जातो तेव्हा खूप राग येतो. लोकांना हे समजतच नाही की, बॉलिवूड सोडूनही अजून खूप आहे. नक्कीच माझे कुटुंब यशस्वी आहे, मात्र याचा अर्थ असा नाही की, मी पण चित्रपटांमध्ये येऊ. ही चुकीची आणि विचित्रच मानसिकता आहे. मी जे काम करत आहे त्यात मी खुश आहे.”

जॅकी श्रॉफची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहीण असलेली कृष्णा देखील अभिनयातच करियर करेल असे अनेकांना वाटले होते, मात्र आता कृष्णाने यासर्व चर्चांवर पूर्णविराम लावला आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सलमान, शाहरुख अन् आमिर घाबरतात कारण…’, नसिरुद्दीन शाह यांनी साधला तिन्ही खानांवर निशाणा

-‘शिवगामीदेवी’ची भूमिका साकारून मेगास्टार झाल्या रम्या; बॉलिवूडमध्ये बोल्ड सीन्ससाठी सतत असायच्या चर्चेत

-OMG! यामी गौतमच्या चेहऱ्याची ही काय झाली हालत, पाहून तुमच्याही अंगावर येतील शहारे


Leave A Reply

Your email address will not be published.