‘हे फक्त टॅक्स चोर नाहीयेत…’ ६५० कोटींच्या हेराफेरीत भक्कम पुरावे सापडल्यानंतर कंगनाचा दावा

Bollywood It Raids Actress Kangana Ranaut Blasts After Income Tax Department Suspects Discrepancy of 650 Crores


बॉलिवूड चित्रपटसृष्टीशी निगडीत काही कलाकारांच्या घरावर बुधवारी (३ मार्च) आयकर विभागाने छापे मारले होते. या छाप्यामध्ये आयकर विभागाने ६५० कोटी रुपयांची हेराफेरी असल्याचे म्हटले. या खुलास्यानंतर आपल्या रोखठोक मतांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौतने मोठा दावा करत प्रश्न उपस्थित केले आहेत.

कंगनाने दावा केला आहे की, ही केवळ करचोरीचे प्रकरण नाही, तर काळ्या पैशाचीही देवाणघेवाण करण्यात आली आहे. तिने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाचा अहवाल ट्वीट केले आहे. यामध्ये छापे टाकण्याची माहिती देण्यात आली आहे. तरीही, यामध्ये कोणाचेही नाव घेण्यात आलेले नाही.

कंगनाने याबाबत प्रश्न उपस्थित करत लिहिले की, “हे फक्त करचोर नाहीयेत, तर काळ्या पैशाचीही मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण केली आहे. शाहीन बाग येथील आंदोलन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त हिंसा भडकवण्यासाठी पैसे देण्यात आले का… काळा पैसा कुठून आला आणि कुठे पाठवला, याचा कोणताही हिशोब नाही?”

दुसऱ्या एका ट्वीटमध्ये तिने लिहिले की, “जे चोर आहेत ते फक्त चोर आहेत, ज्यांना मातृभूमी विकायची आहे आणि तिचे तुकडे करायचे आहेत, ते फक्त गद्दार असतात. जे गद्दारांना साथ देतात ते देखील चोर आहेत… त्यामुले चोरांना भीती वाटते. ते सामान्य व्यक्ती नाही, तर नरेंद्र मोदी असतात.”

या अहवालात म्हटले आहे की, आयकर विभागाद्वारे ३ मार्चपासून मुंबई, पुणे आणि हैदराबादमधील दोन प्रमुख प्रॉडक्शन हाऊस, एक अभिनेत्री आणि दोन टॅलेंट मॅनेजमेंट कंपन्यांमध्ये सर्च ऑपरेशन केले जात आहे. एकूण २८ ठिकाणांवर छापे मारण्यात आले आहेत. यामध्ये यांचे घर आणि ऑफिसचाही समावेश आहे. तपासादरम्यान बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या तुलनेत प्रॉडक्शन हाऊसच्या उत्पनात अनियमिततेचे पुरावे मिळाले आहेत.

कंपनीचे अधिकारी तब्बल ३०० कोटी रुपयांची अनियमिततेचे स्पष्टीकरण देण्यात अपयशी ठरले आहेत. चित्रपट दिग्दर्शक आणि भाग धारकांमध्ये शेअर देवाणघेवाणीत ३५० कोटी रुपयांची हेराफेरी झाल्याचे पुरावे मिळाले आहेत. दुसरीकडे अभिनेत्रीला ५ कोटी रुपयांच्या रोख पावतीची माहिती देता आलेली नाही. या सर्व प्रकरणाचा तपास सुरू आहे.

आयकर विभागाने यामध्ये कलाकारांची नावे घेतली नसली, तरी यामध्ये अनुराग कश्यप, तापसी पन्नी यांच्यासह इतर दोघांचाही समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

अनुराग कश्यप, तापसी पन्नू अडचणीत; तब्बल ६५० कोटींची हेराफेरी, आयकर विभागाला सापडले भक्कम पुरावे

काय सांगता! अनुराग कश्यप आणि तापसी पन्नुच्या संपत्तीचे आकडे ऐकून तुमचेही फिरतील डोळे

ओटीटीवरील अश्लील कंटेंटवर सर्वोच्च न्यायालयाची नजर; म्हणाले, ‘पोर्नोग्राफी दाखवली जातेय’


Leave A Reply

Your email address will not be published.