Tuesday, June 18, 2024

संजय लीला भन्साळींचा गांगुबाईबद्दल मोठा खुलासा; म्हणाले, ‘लोकांनी दिला होता …’

संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती, अशात आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. शनिवारी (दि. 18 फेब्रुवारी)ला त्यांच्या वेब सीरिजचा फर्स्ट लूक समोर आला आहे. सीरिजच्या फर्स्ट लूकमध्ये निर्मात्यांनी मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी, ऋचा चढ्ढा आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या मुख्य भूमिकांची पहिली झलक दाखवली आहे.

गंगूबाई न बनवण्याचे अनेकांनी दिले सल्ले
फर्स्ट लूक लॉन्च इव्हेंटमध्ये, सीरिजचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (sanjay leela bhansali) यांनी त्यांचा मागील चित्रपट गंगूबाई काठियावाडीसोबतच (gangubai kathiawadi) हीरामंडीबद्दल (heeramandi ) खुलासा केला. गंगूबाई न बनवण्याचा सल्ला अनेकांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाली, “लोकांनी मला गंगूबाई बनवू नका असे सांगितले. त्यांनी सांगितले की, ‘हा एक महिलांवर आधारित चित्रपट आहे. तुम्हाला भारताता महिलांवर आधारित दुसरा काेणताही चित्रपट सापाडला नाही का.’ या प्रकारचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालत नाहीत. कारण एक, ही एका सेक्स वर्करची कथा आहे आणि दुसरी, त्यात एकही नायक नाही. तरीही, चित्रपट चांगला चालला. कारण, माझा चित्रपटावर विश्वास होता,”

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

गंगूबाई काठियावाडीने बाॅक्स ऑफिसवर केली दमदार कमाई
संजय लीला भन्साळी यांचा हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये तेव्हा प्रदर्शित झाला, जेव्हा कोरोना महामारीनंतर चित्रपटगृहे पहिल्यांदाच उघडली गेली हाेती. आलिया भट्ट स्टारर हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता. या चित्रपटात आलियाशिवाय अजय देवगण, विजय राज, शंतनू माहेश्वरी, सीमा पाहवा आणि जिम सरभ हे कलाकार दिसले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली.(bollywood movie heeramandi director sanjay leela bhansali revealed people told him not to make gangubai kathiawadi )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘बिग बॉस 16’ फेम अर्चना गौतम एकेकाळी करायची सिलेंडर पोहचवण्याचे काम

फ्लाइटमध्ये शिव ठाकरेंवर फिदा झाली एअर हाेस्टेस; बिग बाॅस स्टारला खास गिफ्ट देत म्हणाली, ‘आई शपथ…’

हे देखील वाचा