समंथाचा यूट्यूब चॅनलला दणका! ‘या’ कारणामुळे दाखल केला मानहानीचा खटला

गेल्या अनेक दिवसांपासून समंथा रूथ प्रभू तिच्या वैयक्तिच आयुष्यासाठी चर्चेत येत आहे. घटस्फोटानंतर आलेल्या कठीण परिस्थितीत समंथा रूथ प्रभू स्वत: साठी उभे राहण्याचा प्रयत्न करत आहे. आता तिने काही यूट्यूब चॅनेलच्या विरूद्ध स्वतःबद्दल खोटे रिपोर्ट्स दाखल केल्याबद्दल मानहानीचा खटला दाखल केला आहे.

अनेक यूट्यूब चॅनलवर बदनामी केला आरोप
सुमन टीव्ही, तेलुगू लोकप्रिय टीव्ही आणि आणखी काही यूट्यूब चॅनेलला समंथाकडून त्यांच्या संबंधित चॅनेलवर तिची प्रतिमा खराब केल्याबद्दल कायदेशीर सूचना प्राप्त होतील. शिवाय, तिने स्पष्टपणे वकील वेंकट राव यांच्या विरूद्ध कायदेशीर नोटीस दाखल केली आहे, जे तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलले होते आणि तिच्यावर आरोपही लावले होते की, तिचे दुसर्‍याशी अफेअर आहे. नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्यानंतर, सोशल मीडियावर ट्रोलर्सद्वारे तिला ट्रोल केले जात आहे.

सर्व नकारात्मकतेच्या पार्श्वभूमीवर, तिने एक वैयक्तिक नोट शेअर केली होती. यामध्ये सर्वांना तिच्यापासून दूर राहण्यास सांगितले होते, कारण ती कोणत्याही प्रकारची नकारात्मकता सहन करणार नाही. तसेच या संघर्षामध्ये तिचा पती नागा चैतन्य किंवा सासरा नागार्जुन हे तिच्या बाजूने उभे नाहीत.

अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर यासोबतच ती एका वेब सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. लोकप्रिय वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन २’ मध्ये तिला शेवटच्या वेळी दहशतवाद्याची भूमिका करताना पाहिले गेले होते. जिथे तिने आपले अभिनयाने आणि ऍक्शन सीक्वेन्सद्वारे प्रेक्षकांना प्रभावित केले होते. शिवाय समंथाकडे काही चित्रपट आहेत. ज्याचे ती लवकरच शूटिंग सुरू करेल.

तसेच घस्फोटानंतर समंथाने ट्विटरवर आणि इंस्टाग्रामवर तिचे नाव बदलले आहे. तिने आता अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे नाव बदलून समंथा रूथ प्रभू असे ठेवले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बॅकलेस की टॉपलेस?’ नव्या आऊटफिटसह अवतरली उर्फी, तर ड्रेस पाहून चाहते पडले गोंधळात

-आर्यन खानला पुन्हा झटका! ‘या’ तारखेपर्यंत राहणार जेलमध्येच, तर व्हॉट्सऍप चॅट्समुळे वाढू शकतात समस्या

-अनन्या पांडेच्या घरी NCB अधिकारी, चौकशीसाठी अभिनेत्रीला समन्स

Latest Post