Friday, December 8, 2023

‘ती माझी गोल्डन गर्ल आहे, वेळ आल्यावर…’, शक्ती कपूर यांचे मुलगी श्रद्धाच्या लग्नाबाबत वक्तव्य

प्रत्येक मुलीच्या वडिलांचे स्वप्न असते की, आपल्या मुलीने खूप शिक्षण घ्यावे आणि मोठी नोकरी करावी. तसेच ती लवकर स्वतःच्या आयुष्यात सेटल व्हावी. तिने लग्न करावं आणि आपल्या पतीसोबत थाटात संसार करावा. मात्र, बाॅलिवूटचे ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांना त्यांच्या मुलीविषयी अजिबात तसे वाटत नाही. शक्ती कपूर यांनी त्यांची मुलगी श्रद्धा कपूरच्या लग्नाविषयी बोलताना स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. माध्यमांत अशा अफवा पसरवल्या जात आहेत की, अभिनेत्री श्रद्धा फोटोग्राफर रोहन श्रेष्ठसोबत लग्न करणार आहे. मात्र, त्यांनी याला स्पष्ट नकार दिला आहे.

शक्ती कपूर म्हणाले की, “रोहन श्रेष्ठ एक कौटुंबिक मित्र आहे, मी त्याच्या वडिलांना अनेक वर्षांपासून ओळखतो. रोहन अनेकदा घरी येतो, पण त्याने कधीच श्रद्धाशी लग्न करण्याबद्दल चर्चा केली नाही. याशिवाय आजकालची मुलं या गोष्टी स्वतःहून ठरवतात. जर श्रद्धा किंवा सिद्धांतने मला सांगितले की, त्यांनी त्यांचा जीवनसाथी निवडला आहे, तर मी ते लगेच स्वीकारेन. मी का नकार देईन? पण यावेळी दोघांचेही लक्ष त्यांच्या करिअरवर आहे. लग्न हा एक अतिशय महत्वाचा निर्णय आहे आणि लोक आता ज्याप्रकारे ब्रेकअप करत आहेत. त्या प्रकारावर मी कधी-कधी खूप नाराज होतो. एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी एखाद्याने आधी खात्री करून घ्यावी.”

आपल्या मुलांच्या करिअरबद्दल बोलताना शक्ती म्हणाले, “मी, श्रद्धा किंवा सिद्धांत यांना त्यांच्या स्वप्नांपासून कधीही रोखले नाही. लोक मला विचारतात की, मी श्रद्धाला अभिनयात करिअर करण्यापासून थांबवले आहे? पण हे सर्व खोटे आहे. तिने खूप काम करुन स्वत: चे नाव कमवावे अशी माझी इच्छा आहे. ती खूप मेहनती आणि हुशार मुलगी आहे. ती माझी ‘गोल्डन गर्ल’ आहे. तिने स्वतःहून बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे, तर सिद्धांत कपूरचा ‘चेहरे’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी या चित्रपटाचे प्रचंड कौतुक केले आहे. मी माझ्या दोन्ही मुलांसह खूप आनंदी आहे, जे त्यांच्या करिअरमध्ये चांगले काम करत आहेत. तसेच मला माझ्या मुलांचा खूप अभिमान आहे.”

श्रद्धा कपूरबद्दल बोलायचं झालं, तर ती लवकरच ‘तू झुठी मैं मक्कर’ मध्ये दिसणार आहे. जो 8 मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित हाेईल.(bollywood shakti kapoor said shraddha kapoor is my golden girl she will decide her life partner in time nodkp)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी होणार अजय देवगणच्या ‘भोला’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

पार्टी गाजवणारे सलमान खानच्या किसी का भी किसी की जान सिनेमातील ‘बिल्ली बिल्ली’ गाणे प्रदर्शित

हे देखील वाचा