Friday, March 29, 2024

भारीच ना! टाइम्सच्या ‘१०० मोस्ट इन्फ्लुएन्शल पीपल्स’च्या यादीत ‘या’ महिला गायिकेचा समावेश

मोठ- मोठे कलाकार, गायक, डान्सर आणि वेगवेगळ्या श्रेत्रामध्ये पारंगत असलेल्या व्यक्तीचे एकदातरी टाइम्स पत्रिकाच्या ‘१०० मोस्ट इन्फ्लुएन्शल पीपल्स’ (सर्वात प्रभावशाली लोक) मध्ये आपले नाव यावे, असे स्वप्न असते. यंदा ब्रिटनी स्पिअर्सचे हे स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण झाले आहे. ब्रिटनी ही एक गायिका आणि गीतकार असून जगभरामध्ये तिच्या गाण्यांचे चाहते आहेत. तिने आपल्या कारकिर्दीमध्ये केलेल्या मेहनतीमुळेच आज तिचे नाव टाइम्स पत्रिकाच्या ‘१०० मोस्ट इन्फ्लुएन्शल’ व्यक्तींमध्ये कोरले गेले आहे. आपल्या संगीताने कायम प्रकाशझोतात असलेल्या ब्रिटनीला कोणत्याही मोठ्या पुरस्काराची गरज उरली नाही. परंतु तिला मिळालेला सध्याचा सन्मान अतुलनीय आहे.

ब्रिटनीला आल्यात मन भरून येणाऱ्या शुभेच्छा
ब्रिटनीची मैत्रीण पॅरिस हिल्टनने तिच्या या सन्मानाबद्दल तिचे मोठे कौतुक केले आहे. पॅरिस हिल्टन म्हणाली की, “लोक जेव्हा ब्रिटनीविषयी बोलत असतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर एक हुशार, सुपरस्टार व्यक्तिमत्त्व असलेली ब्रिटनी उभी राहत असेल, पण मी ज्या ब्रिटनीला ओळखते ती या जगातील सर्वात प्रेमळ आत्मा आहे, गोड आई आहे, मैत्रीण आहे आणि एक योद्धा देखील आहे.”

पुढे पॅरिस असेही म्हणाली की, “ब्रिटनीच्या आयुष्यात आजवर अनेक कठीण प्रसंग आले, पण तिने या सर्वांवर मात करत स्वतःला पुढे नेले. तिने कधीच पराभव पत्करला नाही.”

‘या’ कलाकारांनी देखील यादीमध्ये कोरले आहे स्वतःचे नाव
ब्रिटनी बरोबरच अनेक कलाकारांनी या यादीमध्ये स्वतःची जागा निर्माण केली आहे. यामध्ये डॉली पार्टन, टेनिस चॅम्पिअन नाओमी ओसाका आणि रूसी विरोधी पक्षनेत्या एलेक्सी नवलनी. तसेच ऑस्कर विजेती केट विंसलेट, प्यूर्टो रिकान, गीतकार बॅड बनी, रॅपर लिल नॅस एक्स आणि अभिनेत्री स्कारलेट जोहानसन, अभिनेता जेसन सुदेकिस अशा अनेक महान व्यक्तींनी या यादीमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मलायका अरोराला आवडतो ‘अशा’प्रकारचा व्यक्ती, मिलिंद सोमणपुढे केला खुलासा

-निधन झाले गायिकेचे, पण सपना चौधरीलाच ठरवले मृत; अफवेने उडाली होती कुटुंबीयांची झोप

-ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद, ‘ही’ आहे शेवटची पोस्ट

हे देखील वाचा