Friday, December 8, 2023

रक्षाबंधनाच्या दिवशी सुशांत सिंगच्या आठवणीत श्वेता सिंग झाली भावूक; म्हणाली, ‘तुझा आवाज…’

बुधवारी (30 ऑगस्ट) संपूर्ण देशात रक्षाबंधन दिन साजरा केले गेला. भारतीय संस्कृतीनुसार, रक्षाबंधन हा दिवस भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचा, मायेच दिवस असतो. प्रत्येक बहिण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीला काही ना काही वस्तू गिफ्ट देतो. रक्षाबंधन हा सण सामान्य व्यक्तींपासून ते सेलिब्रेटींपर्यत सगळेच सेलिब्रेट करत असतात. अशातच बॉलीवूड सेलिब्रिटीही आपल्या भावंडांसोबतचे फोटो शेअर करत आहेत आणि त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या खास प्रसंगी दिवंगत सुशांत सिंग राजपूतची बहीण श्वेता कीर्ती सिंग हिनेही तिच्या भावाची आठवण काढली आहे.

सुशांतला (Sushant Singh) आठवून त्याची बहीण भावूक झाली आहे. श्वेताने (Shweta Singh) रक्षाबंधन (Rakshabandhan) निमित्त सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने सुशांत लहानपणी कसा दिसत होता हे दाखवले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून सुशांतचे चाहते देखील भावूक झाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत.

व्हिडीओ शेअर करताना श्वेताने कॅप्शनमध्ये लिहिले की, “कधी कधी वाटतं तू कुठेही गेला नाहीस, तू इथेच आहेस. कधी कधी वाटतं की, मी तुला पुन्हा भेटू शकणार नाही. मी तुझ्याशी कधीच बोलू शकणार नाही. तुझे हसणे, तुझा आवाज मला कधीच ऐकू येणार नाही. तुला गमावण्याचं दु:ख मला कुणासोबत तरी वाटून घ्यायचं नाही. हे माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. पण कधीकधी हृदयाच्या सर्वात जवळ असलेल्या गोष्टींचे वर्णन करण्यासाठी शब्द नसतात.”

श्वेताने पुढे लिहिले की, “ही वेदना दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. भाऊ, लवकरच दुसऱ्या बाजूने भेटू, जोपर्यंत मी देखील उपहास, मनोरंजन किंवा प्रेरणा देणारी कथा बनत नाही. मी माझ्या मनगटावर राखी बांधते आणि प्रार्थना करते की तु कुठेही असशील तिथे तु शांती आणि आनंदात रहा.”

या पोस्ट वर कमेंट करताना एकाने लिहिले की, “मी जेव्हाही त्याला पाहतो तेव्हा मी का भावूक होऊन जातो? तर दुसर्‍याने लिहिलं की,”तू नेहमी आमच्या हृदयात राहशील.” सुशांत सिंग राजपूत 14 जून 2020 रोजी त्याच्या मुंबईतील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. सुशांतचे चाहते आजही त्याला विसरलेले नाहीत. (On Rakshabandhan, Shweta Singh gets emotional in memory of Sushant Singh, watch video)

अधिक वाचा- 
49 वर्षिय ऋतिक रोशन आपल्या जीम ट्रेनरला देतो ‘एवढी’ फी ; आकडा वाचून बसेल धक्का
तारीख ठरली! ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात; मेहंदीचा व्हिडिओ शेअर करत म्हणाली…

हे देखील वाचा