‘या’ अभिनेत्रीने केला आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा, म्हणाली “आता सर्व देवावर….

हिंदी चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात सध्या अनेक कलाकारांचे वैवाहिक संबंध ठीक नसल्याच्या बातम्या नेहमीच समोर येत असतात. अनेक मोठमोठे कलाकार सध्या घटस्फोट घेण्याच्या मार्गावर आहेत. काही जणांनी अचानक घटस्फोट घेत सगळ्यांना धक्का दिला आहे आता ही चारू असोपा आणि तिचा पती राजीव सेन यांचे नाते अशाच वळणावर उभे असल्याचे चित्र दिसत आहे. याचा खुलासा खुद्द चारूने केला आहे, काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.

चारू असोपा आणि राजीव सेन यांच्यात दुरावा असल्याची अफवा पुन्हा एकदा पसरली आहे. याचा उलगडा सुष्मिता सेनच्या भावाने युट्यूब चॅनेलवर त्यांची मुलगी जियाना हिचा फोटो शेअर केला त्यावेळी झाला. त्याने एक चिठ्ठी लिहिली आणि सांगितले की तो बराच काळ आपल्या मुलीला भेटला नाही. त्याने यामध्ये “जियाना तुझ्या वडिलांच्या घरी परत ये, इतका प्रवास करणे तुझ्यासाठी सुरक्षित नाही, खूप दिवसांपासून तुला पाहिले नाही… लवकर परत ये आणि माझ्याबरोबर खेळ.” अशी भावनिक साद घातली आहे. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या जोर धरू लागल्या आहेत. यावर काही माध्यमांनी चारू असोपाला फोन करून या बातम्या सत्य आहेत का याबाबत पडताळा केला मात्र यावर “मला आत्ताच याबद्दल बोलायचे नाही”. असे म्हणत तिने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

मात्र समोर आलेल्या बातमीनुसार, चारू असोपा आणि राजीव सेन गेल्या काही महिन्यांपासून वेगळे राहत आहेत. चारू सध्या आपल्या मुलीसोबत तिच्या मूळ गावी बिकानेरमध्ये आहे, तर राजीव मुंबईत आहे. यापुर्वी ही चारूने तिच्या आणि राजीव यांच्यातील दुराव्याबद्दल सांगितले होते. यावेळी “प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या येतात. असेही ती म्हणाली होती. याआधी चारू एका मुलाखतीत बोलताना म्हणाली की “मला माहित नाही की आम्ही एकत्र आहोत की नाही, मी आत्ता एवढेच सांगू शकतो की तो दिल्लीत आहे आणि मी इथे मुंबईत आहे. मलाही एवढंच माहीत आहे जे तुम्हाला माहीत आहे. भविष्यात काय घडेल यासाठी देव निर्णय घेईल आता सर्व काही त्याच्यावर सोडले आहे.”

याबद्दल पुढे बोलताना चारू असोपा म्हणाली की, “मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या असतात आणि आपण सर्वच चढ-उतारांमधून जातो, फक्त मी सेलिब्रिटीज आहे त्यामुळे आपल्याबद्दल खूप काही लिहिलं जातं. जर माझ्याकडे काही आशादायक असेल तर मी ते नक्कीच पाहीन आणि जेव्हा मला मिळेल,तेव्हा मी सगळ्यांसोबत शेअर करेन.” तिच्या या बोलण्यातून सध्या त्यांच्या नात्यात आलबेल नसल्याचेच दिसत आहे.

हेही वाचा- 

दत्तक घेतलेल्या मुलामुळे ट्रोल झाली सनी लिओनी, म्हणाली ‘जज करण्यापूर्वी माझे आयुष्य…’

‘तांडव २’ वेबसिरीजची शूटिंग झाली सुरु? जीशान अय्यूब केला त्याच्या मुलाखतीत खुलासा

निया शर्मा ‘जिम बॉल’सोबत करू शकली नाही बॅलन्स, म्हणाली ‘अपयशांचा आनंद घ्या’

 

Latest Post