×

‘तारे जमीं पर’ फेम दर्शिल सफारीचा ‘तो’ व्हिडिओ पाहून नेटकरी झाले भावुक; ‘याला कोणीतरी…’

आमिर खानचा (Aamir Khan) ‘तारे जमीं पर’ चित्रपट त्याकाळात चांगलाच गाजला होता. चित्रपटाची कथा आणि अभिनयाचे सर्वांनी तोंडभरुन कौतुक केले होते. याच चित्रपटात दर्शील सफारी (Darsheel Safary)  नावाचा कलाकार सर्वत्र लोकप्रिय झाला होता. या चित्रपटात त्याने लहान मुलाची भूमिका साकारली होती. आज तो २५ वर्षांचा आहे. नेटफ्लिक्सच्या ‘मदर्स डे स्पेशल’ व्हिडिओमुळे तो पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. या व्हिडिओमध्ये आई-मुलाच्या नातेसंबंधाबद्दल माहिती सांगणारी एक क्लिप दाखवण्यात आली आहे.

दर्शीलच्या चाहत्यांना हा व्हिडिओ आवडला असून त्यांना पुन्हा एकदा त्याला बघायला मिळाल्याने ते खूश आहेत. ‘तारे जमीन पर’ मधील ‘मैं कभी बतलाता नहीं’ या प्रसिद्ध गाण्यातील एका ओळीने दर्शीलने आपल्या बोलण्याची सुरुवात केली. व्हिडिओच्या सुरुवातीलाच दर्शील म्हणतो, “मी कधीच सांगत नाही, पण आज मी तुम्हाला आईबद्दलच्या काही माहित नसलेल्या गोष्टी सांगेन.” माता आपल्या मुलांच्या समस्या न बोलता कशा समजून घेतात आणि कदाचित त्यांच्या घरी बनवलेल्या अन्नाने त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात याबद्दल त्याने एक कविता वाचली.

दर्शील पुढे सांगतो की, माता आपल्या मुलांना कशा प्रकारे समजून घेतात आणि त्यांच्यासाठी एकट्या जगाशी लढू शकतात. आईला ‘सुपरह्युमन’ म्हणत तो कविता संपवतो. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये “आम्हाला शाळेच्या बसमध्ये सोडण्यापासून आणि चमचा कसा वापरायचा ते १७ मिस्ड कॉलपर्यंत… आईला खरंच सगळं माहीत असतं! खऱ्या सुपरहिरोला मदर्स डेच्या शुभेच्छा,” असे सुंदर कॅप्शन दिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

‘द स्काय इज पिंक’, ‘तारे जमीन पर’, ‘कल हो ना हो’, ‘जाने तू या जाने ना’ यांसारख्या चित्रपटांतील दृश्यांसह हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. दर्शीलला पाहून त्याचे चाहते खूपच खुश झाले आहेत. यावर अनेकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने “बऱ्याच दिवसांनी दर्शील सफारी!” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर आणखी एका चाहत्याने तर दर्शीलला ‘रिअल स्टार किड’ म्हटले. दरम्यान ‘तारे जमीन पर’मधून बालकलाकार म्हणून सुरुवात करणाऱ्या दर्शील सफारीने नंतर ‘बम बम बोले’, ‘जोक्कोमन’ आणि ‘मिडनाइट्स चिल्ड्रन’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. २०१२ मध्ये ‘झलक दिखला जा ५’ मध्येही तो सहभागी झाला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post