Monday, October 14, 2024
Home टेलिव्हिजन टेलिव्हिजनवरील पॉवर कपल असणारे गुरमीत आणि देबीना झाले आईबाबा, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज

टेलिव्हिजनवरील पॉवर कपल असणारे गुरमीत आणि देबीना झाले आईबाबा, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंगने (Bharati Singh) मुलाला जन्म दिल्याची बातमी चर्चेत असतानाच आता आणखी एका टिव्ही अभिनेत्रीने गुड न्यूज दिल्याची माहिती समोर आली आहे. ही अभिनेत्री म्हणजे देबीना बॅनर्जी.  गुरमीत चौधरी (Gurmit Choudhary) आणि देबीना बॅनर्जी (Debina Bonnerjee) हे छोट्या पडद्यावरील पावरफुल कपल म्हणून ओळखले जाते. अभिनेत्री देबीनाने ३ एप्रिलला एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. या बातमीने दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंद दिसत आहे. 

याबाबत संपुर्ण माहिती अशी की, टिव्हीवरील प्रसिद्ध जोडी अभिनेता गुरमीत चौधरी आणि देबीनाने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ते पालक झाल्याचा आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये त्यांनी बाळाचा चेहरा दाखवला नाही. पण आपल्या या गोड पाहुण्याच्या आगमनाने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओवर त्यांच्या चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. देबीनाच्या या व्हिडिओला आत्तापर्यंत चार लाख लोकांनी पाहिले आहे. यावरुन त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज येऊ शकतो.

दरम्यान, ‘पति, पत्नी और वो’ या मालिकेच्या शूटिंगदरम्यान गुरमीतने देबिनाला प्रपोज केले होते. त्यानंतर २०११ मध्ये दोघांनी एका खासगी समारंभात लग्न केले. 2008 मध्ये ‘रामायण’ या टेलिव्हिजन मालिकेच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. या मालिकेत त्यांनी राम आणि सीतेची भूमिका साकारली होती. येथूनच दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली आणि छोट्या पडद्यावरील या जोडप्याने १५ फेब्रुवारी २०११ रोजी लग्न केले होते. लग्नाच्या ११ वर्षानंतर दोघेही आई बाबा बनले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा