चर्चेत राहण्यासाठी आणि फॅन्ससोबत जोडले जाण्यासाठी कलाकार सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात. काही मोजकेच अपवाद वगळता, सर्व कलाकार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात. सोशल मीडियाचा वापर ते फोटो टाकण्यासाठी तर करतातच. शिवाय अनेक फनी, आगळे वेगळे व्हिडिओ देखील ते पोस्ट करत असतात. बॉलिवूडची मस्तानी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील सोशल मीडियावरील पोस्टमुळे खूप चर्चेत असते. दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या जोरदार गाजत आहे.
दीपिकाने तिचा एक खूपच विचित्र आणि घाबरावणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून नेटकरी ती लवकरच एखाद्या हॉरर सिनेमात दिसणार असल्याचे म्हणत आहेत. दीपिकाने रणवीर सिंगच्या वाढदिवसाच्या दिवशी हा व्हिडिओ शेअर केला होता.
व्हिडिओमध्ये अतिशय वेगळी आणि भीती वाटणारा फोटो दिसत आहे. हा फोटो दीपिकाचा असून, ती यात डोळे बंद करून खुर्चीवर बसलेली दिसत आहे. पुढे कॅमेरा झूम होतो दीपिकाचा फोटो जिवंत होतो आणि ती जोरजोरात श्वास घ्यायला लागते. व्हिडिओच्या बॅकग्राउंडला भीती वाटणारे संगीत चालू आहे. नंतर त्या फोटो फ्रेममध्ये दुसरी दीपिका दिसायला लागते, जी आधीच्या दीपिकाला नष्ट करते आणि स्वतः टेबलवर बसून पोज देते. हा व्हिडिओ शेअर करताना दीपिकाने भुताचा ईमोजी पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी दीपिकाला अनेक प्रश्न विचारले आहेत, ‘हे काही समजले नाही?’, ‘हे काय होते आणि का होते?’ (deepika padukone shares scary video)
दीपिकाच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगायचे झाले, तर ती लवकरच प्रभाससोबत ‘Project K’, शाहरुख खानसोबत ‘पठाण’, ऋतिक रोशनसोबत ‘फायटर’ आणि शकुन बत्राच्या सिनेमात दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-रिंकू राजगुरुने पहिल्यांदाच केले प्रोफेशनल फोटोशूट; लक्षवेधी ठरतेय त्यावर ईशान खट्टरची ‘ही’ कमेंट
-राजकुमार हिरानींच्या आगामी चित्रपटात दिसणार किंग खान; सोबतच झळकणार या ‘तीन’ प्रसिद्ध अभिनेत्रीही