रिंकू राजगुरुने पहिल्यांदाच केले प्रोफेशनल फोटोशूट; लक्षवेधी ठरतेय त्यावर ईशान खट्टरची ‘ही’ कमेंट


आपल्याला जर आयुष्यात मार्गदर्शन करणारी, आपल्यातील प्रतिभा ओळखणारी योग्य व्यक्ती भेटली की जीवन सुकर बनते. मेहनत नक्कीच घ्यावी लागते, मात्र ती मेहनत योग्य गोष्टींवर घेता येते. मराठीमध्ये असेच एक हुशार दिग्दर्शक असणाऱ्या नागराज मंजुळे यांनी एका अभिनेत्रीमधील प्रतिभा ओळखली आणि मराठी चित्रपटसृष्टीला एक दमदार अभिनेत्री मिळाली. ती अभिनेत्री आहे, रिंकू राजगुरु. पहिल्याच सिनेमातून रिंकूने अमाप लोकप्रियता तर मिळवली सोबतच तिने याच सिनेमातून तिची अभिनयाची ताकद देखील सर्वाना दाखवली.

रिंकू राजगुरु आज सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. रिंकू आता आधीपेक्षा अधिक ग्लॅमरस दिसते. फॅट तो फिट असा प्रवास करणारी रिंकू आता खूपच आकर्षक झाली आहे. ती नेहमी तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. नुकतेच तिने ‘पहिले फोटोशूट’ असे कॅप्शन देत, तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. या फोटोंमध्ये तिने चेक्सचे जॅकेट, पांढऱ्या रंगाचे टीशर्ट आणि डेनिम घातलेली दिसत असून, हातात जॅकेटला मॅच होणारी चेक्सची बॅग घेतली आहे. यात फोटोंमध्ये रिंकू अतिशय सुंदर दिसत आहे. या फोटोशूटचे वैशिष्ट म्हणजे हे फोटोशूट तिचे पहिलेच प्रोफेशनल फोटोशूट आहे. (rinku rajguru has done her first professional photoshoot )

हे फोटो पोस्ट केल्यानंतर थोड्याच वेळात हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. तिच्या या फोटोवर फॅन्स आणि नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या फोटोंवर बॉलिवूडमधील ‘धडक’ फेम अभिनेता ईशान खट्टर, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आदी अनेक कलाकारांनी देखील रिंकूच्या या फोटोंवर कमेंट केली आहे. विशेष म्हणजे ईशान खट्टरची ही लक्षवेधी कमेंट आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

रिंकूने स्वतःसाठी अभिनयात कोणत्याही मर्यादा, अटी घातल्या नाहीये. त्याचमुळे ती कन्नड आणि हिंदीमध्ये देखील काम करताना आपल्याला दिसते. मागच्या वर्षी रिंकूची ‘हंन्ड्रेड’ ही वेबसिरीज प्रदर्शित झाली होती. आता रिंकू ‘२००’ या नवीन सिनेमात दिसणार आहे. नुकतीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली. सार्थक दासगुप्ता या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून या चित्रपटात रिंकूसह जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर, बरुण सोबती, साहील खट्टर, इंद्रनिल सेनगुप्ता, उपेंद्र लिमये, सलोनी बात्रा आदी कलाकार दिसणार आहे.

आगामी सिनेमांमध्ये रिंकू नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या हिंदी सिनेमात दिसणार असून, या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका आहे. सोबतच मराठीमध्ये ती ‘छूमंतर’ या मराठी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी, ऋषी सक्सेना हे देखील आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आलिया भट्टला भेटायला आला तिचा चिमुकला चाहता; भल्यामोठ्या गर्दीतही अभिनेत्रीने दिली सेल्फी

-कारगिल विजय दिन: सैनिकांच्या नावावर अजय देवगणची खास कविता; अक्षयनेही दिली अशी प्रतिक्रिया

-या अभिनेत्यांनी खोटे सिक्स पॅक वापरून केलंय चित्रपटात काम; मात्र प्रेक्षकांना हे समजताच करावा लागला ट्रोलिंगचा सामना


Leave A Reply

Your email address will not be published.