Friday, July 12, 2024

आशिष विद्यार्थी यांची महिलेने उडवली खिल्ली, म्हणाली, तुम्ही कोण..?

अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतच नाही तर साउथ इंडस्ट्रीमध्येही आपल्या दमदार अभिनयाने प्रसिद्धी मिळवली आहे. त्यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. आपल्या धमाकेदार अभिनयाने प्रेक्षकांच्याल मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. त्यांनी जास्त तर खलनायकाच्या भूमिका साकारण्यासाठी ओळखले जाते. आशिष नेहमी आपल्या सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. सतत नवीन पदार्थाचे फोटो आणि व्हिडिओ शेअ करत असतात.

आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi ) सध्या आपल्या मोठया प्रोजेक्टमुळे कामामध्ये खूपच व्यस्त असतात मात्र, तरीही ते आपल्या सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी जोडलेले असतात. त्यांचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्याने स्वत: आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला असून त्यामुळे चाहते या व्हिडिओचे खूपच कौतुक करत आहेत.

आशिष विद्यार्थी यांनी शेअर केल्या व्हिडिओमध्ये एक महिला त्यांना ओळखण्याचा प्रयन्त करते पण ती ओळखण्यात यशस्वी होत नाही. तेव्हा अभिनेता तिला चांगलेच अत्तर देतात. या व्हिडिओमध्ये अभिनेता विमानामध्ये प्रवास करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ शेअर करत असताना अभनेत्याने भन्नाट कॅप्शनमध्ये लिहिले की, “चंदीगडला जाणार्‍या फ्लाइटमध्ये एक सुखद अनपेक्षित भेट. फ्लाइटला उशीर झाला असला तरी, मध्येच काहीतरी मजेदार घडले.” अशिष विद्यार्थी यांना पाहून एक महिला त्यांना ओखण्याचा प्रयत्न करते पण तिला अभिनेताचे नावच माहीत नसते. पण तरीही ती महिला म्हणते की मी तुम्हाला चित्रपटामध्ये पाहिले आहे, तेव्हा अभिनेता म्हणतात की, “मी चित्रपटामध्ये काम करत नाही. तुम्ही मला नक्कीच बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये पाहिले असेल. माझा लाकडांचा व्यवसाय आहे.” मग अभिनेता त्या लहान मुलालाही बोलतात त्याच्याकडून बिस्कीट मागताना दिसत आहेत मात्र, लहान मुलगा बिस्कीट सोडत नाही.

हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर चाहत्यांनी खूपच चांगला प्रतिसाद दिला आहे. यामध्ये अभिनेता महिलेची चांगलीच फजीती करतातस. त्यांचा व्हिडिओ पाहूण असे वाटते की, अभिनेता खूपच गोड स्वभावाचे आहेत,

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शालिन भनोट आणि टीना दत्ताचे पॅचप! कन्फेशन रुममध्ये अभिनेत्याने केला खुलासा…
दिग्दर्शक इंद्र कुमार यांचा थेटट्रोलर्सलाच प्रश्न; ‘अक्षय कुमार पॅन्टशर्ट घालून क्रिष्णाची भूमिका करु शकतो मग चित्रगुप्त…’

हे देखील वाचा