Tuesday, February 18, 2025
Home टेलिव्हिजन अनन्याला इंडस्ट्रीत आणण्यासाठी चंकी पांडेने पैसे दिले होते का? ‘या’ अभिनेत्रीने केला खुलासा

अनन्याला इंडस्ट्रीत आणण्यासाठी चंकी पांडेने पैसे दिले होते का? ‘या’ अभिनेत्रीने केला खुलासा

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची (Chunky Panday) मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) हिने आता इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. अनन्याने जास्त चित्रपटांमध्ये काम केले नसले, तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने ती चर्चेत असते. कधी अनन्या तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते, तर कधी वैयक्तिक कारणांमुळे. आता अनन्या लवकरच करण जोहरच्या (Karan Johar) ‘कॉफी विथ करण ७’मध्ये सहभागी होणार आहे. जिथे ती करणच्या मजेशीर प्रश्नांची उत्तरे देणार आहे.

करण जोहरने त्याच्या इंस्टाग्रामवर शोचा एक प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये स्टार्स त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसत आहेत. यात करण अनन्यालाही प्रश्न विचारतो. करण अभिनेत्रीला विचारतो, “तू तुझ्या वडिलांबद्दल ऐकलेली सर्वात मजेदार अफवा कोणती आहे?” या प्रश्नाच्या उत्तरात अनन्या म्हणते, “पप्पाने मला या इंडस्ट्रीत आणण्यासाठी पैसे दिले आहेत. मात्र सगळ्यांना माहित आहे की, माझ्या वडिलांना पैसे देण्यात तीव्र नापसंती आहे.” (did chunky pandey give money to launch ananya panday in industry)

समंथाने लग्नाबाबत शोमध्ये केले ‘हे’ वक्तव्य
समंथा रुथ प्रभूही (Samantha Ruth Prabhu) लवकरच करण जोहरच्या शो ‘कॉफी विथ करण सीझन ७’ मध्ये दिसणार आहे. प्रोमोमध्ये समंथा वैवाहिक जीवनाबद्दल बोलताना दिसत आहे. प्रोमोमध्ये अभिनेत्री म्हणते, “तुमच्या सुखी वैवाहिक जीवनाचे कारण तुम्ही स्वत: असता. तुम्ही आयुष्याला K3G (कभी खुशी कभी गम) म्हणून पाहता, पण खरे आयुष्य ‘KGF’ सारखे आहे.” समंथाचे बोलणे ऐकून करणही हसू लागला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा