Sunday, December 3, 2023

‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला? ‘हे’ कलाकार घालणार धुमाकूळ

तारुण्यातल्या भावविश्वाचा हळवा कप्पा प्रत्येकाने आपल्या मनाशी जपलेला असतो. यासोबत मैत्री, प्रेम, विश्वास या सगळ्यांचा नव्याने अर्थ उमगायला लागलेला असतो. या सळसळत्या तारुण्यातल्या काही मित्रांची गोष्ट आपल्याला ‘दिल दोस्ती दिवानगी’ हा आगामी चित्रपट सांगणार आहे. येत्या 6 ऑक्टोबरला हा चित्रपट आपल्या भेटीला येतोय. ट्रान्स इंडिया मिडिया अँड एन्टरटेनमेन्टची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला. ‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपटाची निर्मिती राजेंद्र राजन यांची असून शिरीष राणे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

‘दिल दोस्ती दिवानगी’ (Dil Dosti Diwanagi)  ही ट्रान्स इंडिया मिडिया अँड एन्टरटेनमेन्टची पहिली मराठी चित्रपट निर्मिती आहे. आमची आमची ही कलाकृती प्रेक्षकांची नक्की मने जिंकेल असा विश्वास निर्माते राजेंद्र राजन यांनी याप्रसंगी व्यक्त केला. या प्रेमकथेच्या प्रवासात प्रेक्षक नक्कीच गुंतून जातील असं सांगताना ही ‘दिल दोस्ती दिवानगी’ प्रेक्षकांसाठी वेगळा अनुभव ठरेल असा विश्वास दिग्दर्शक शिरीष राणे यांनी व्यक्त केला.

कॉलेज लाइफमध्ये धम्माल मस्ती करणारी दोस्त मंडळी, एकमेकांशी असलेले नाते आयुष्यभर जपतात. त्यांच्या याच मैत्रीच्या नात्याचा वेध आणि प्रेमाच्या नात्यातील गुंतागुंत दाखवतानाच, घडणाऱ्या काही घटनांमुळे बदलत जाणारे नात्याचे रंग याचा रंजक प्रवास ‘ दिल दोस्ती दिवानगी’ हा चित्रपट उलगडतो. कश्यप परुळेकर, वीणा जगताप, चिराग पाटील, स्मिता गोंदकर, अतुल कवठळकर, तीर्था मुरबाडकर, तपन आचार्य, दुर्वा साळोखे, कंवलप्रीत सिंग या नव्या दमाच्या तरुण कलाकारांची फळी यात पहायला मिळतेय. सोबत प्रदीप वेलणकर, विजय पाटकर, स्मिता जयकर, विद्याधर जोशी, सुरेखा कुडची यांसारख्या अनुभवी आणि मात्तब्बर कलाकारांची साथ त्यांना मिळाली आहे.

‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपटाचे छायांकन धनंजय कुलकर्णी तर संकलन अमोल खानविलकर यांचे आहे. कथा, पटकथा, संवाद दीपक तारकर यांचे आहेत. अवधूत गुप्ते, वैशाली सामंत,सोनाली पटेल यांच्या आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहे. सोनाली उदय यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. कार्यकारी निर्माते अनुराधा बोरीचा,इ.सुरेश प्रभाकर आहेत. सहाय्यक दिग्दर्शक जुईली पारखी आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि राजेश बिडवे यांचे असून कलादिग्दर्शक केशव ठाकूर आहेत. (Dil Dosti Diwanagi movie will hit the screens on October 6)

अधिक वाचा-
रूबीना दिलैकने शेअर केले तिचे स्विमसूटमधील बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो, पाहा जबराट लूक
अंकिता लोखंडेने सांगितला ‘पवित्र रिश्ता’च्या सेटवरील ‘तो’ किस्सा; म्हणाली, ‘रात्रंदिवस सेटवर..’

हे देखील वाचा