Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीच्या बोल्डनेसने केला कहर, ‘बॉलिवूडमध्ये कधी येणार?’ म्हणत चाहते करतायत विचारणा

नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीच्या बोल्डनेसने केला कहर, ‘बॉलिवूडमध्ये कधी येणार?’ म्हणत चाहते करतायत विचारणा

बॉलिवूड असो किंवा सोशल मीडिया, सध्या नव्वद आणि ऐंशीच्या दशकातील कलाकारांची मुले सर्वत्र चर्चेत आहेत. यात श्रीदेवी, अमृता सिंग, चंकी पांडे यांच्या मुलींनी तर चित्रपटात आणि सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यामध्ये समावेश होतो तो म्हणजे नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते दीपक तिजोरी यांच्या मुलीचा. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. त्यामुळे तिचे फॅन फॉलोविंग देखील जबरदस्त आहे.

नव्वदच्या दशकात आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावणारे अभिनेते दीपक तिजोरी आज चित्रपटसृष्टीपासून लांब आहेत. दीपक यांनी खलनायका पासून ते अगदी नायकाच्या मित्रापर्यंत अनेक भूमिका साकारल्या आहेत. तिथेच त्यांची मुलगी देखील चित्रपटात धमाल करण्यासाठी सज्ज झाली आहे.

दीपक तिजोरी यांनी मुलगी समारा तिजोरी ही सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. ती तिच्या बोल्ड लूकमुळे खूप चर्चेत आहे. अजून समाराने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला नाहीये तरी देखील चाहत्यांची संख्या खूप आहे. सोशल मीडियावर तिला तिचे चाहते बॉलिवूडमध्ये प्रवेश कधी करणार आहेस, असे प्रश्न विचारत असतात.

समारा ही तिच्या आयुष्यातील प्रत्येक घटना सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना सांगत असते. ती सध्या एक ऑनलाईन ऍक्टिंग क्लासमध्ये अभिनयाच्या छोट्या- छोट्या गोष्टी शिकत आहे.

समारा याआधी ‘ग्रँड प्लॅन’ या शॉर्ट फिल्ममधून प्रेक्षकांच्या समोर आली आहे. यामध्ये तिने एक लिपलॉक सीन दिला होतो. तो खूपच व्हायरल झाला होता. तिच्या एकच शॉर्टफिल्मने तिने हे सिद्ध केले होते की, बॉलिवूड मधील अभिनेत्रींपेक्षा काही कमी नाहीये. तिच्या चाहत्यांनी आता तिला बॉलिवूडमध्ये बघण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अमिताभ बच्चन यांच्या बालपणीचे पात्र साकारून नाव कमावणारा ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता झाला अचानक गायब, आता करतो तरी काय?

-पत्नी आणि मुलींच्या जवळ राहण्यासाठी रणधीर कपूर होणार नवीन घरात शिफ्ट, आपल्या जुन्या घराबाबत उघड केले ‘हे’ गुपीत

-राधे चित्रपटातील किसींग सीनबाबत दिशा पटानीचा मोठा खुलासा, म्हणाली…

हे देखील वाचा