Sunday, May 19, 2024

हिंदी चित्रपटसृष्टीत उडाला आणखी एका लग्नाचा बार, ‘हा’ प्रसिद्ध दिग्दर्शक चढला बोहल्यावर

हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या अनेक कलाकार आणि चित्रपट क्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शकांच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. अभिनेता विकी कौशल, मौनी रॉय, अशा अनेक प्रमुख कलाकारांनी लग्न केले असताना आता आणखी एका दिग्गज दिग्दर्शकाच्या लग्नाची बातमी समोर आली आहे. कोण आहेत हे दिग्दर्शक चला जाणून घेऊ.

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते लव रंजन आणि अलिशा वैद यांनी अखेर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. बर्‍याच काळापासून डेट करत असलेल्या या जोडप्याने 20 फेब्रुवारीला एका शानदार सोहळ्यात लग्न केले आणि आग्रामध्ये लग्नगाठ बांधली. या शाही विवाह सोहळ्याची सुंदर छायाचित्रे शेअर करताना लव प्रॉडक्शनने लिहिले की, “अलिशा आणि लव हे त्यांचा नवीन प्रवास एकत्र सुरू करत आहेत. आम्हाला तुमचे आशीर्वाद आणि प्रेम कायमस्वरूपी मिळावे.”

या शाही विवाह सोहळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. ज्यामध्ये कार्तिक आर्यन, अर्जुन कपूर, रणबीर कपूर, श्रद्धा कपूर, जॅकी भगनानी, रकुल प्रीत सिंग अशा हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या दिग्गज कलाकारांचा समावेश होता. सोबतच विविध क्षेत्रातील मान्यवर या लग्नात पाहुणे म्हणून उपस्थित होते. सिग्नेचर ज्वेलरी सेटसह पारंपारिक लाल लेहेंग्यात आलिशा खूपच मनमोहक दिसत होती. अलीशाने तिचा संपूर्ण वधूचा लूक रंगीत आणि पारंपरिक सोन्याच्या दागिन्यांसह पूर्ण केला होता. अभिनेता राजकुमार रावने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन या लग्नाची काही छायाचित्रे शेअर करत लिहिले की, “आत्तापासून कायमचे हे एक झाले आहेत” अशा सुंदर शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत.

लव रंजन यांनी  ‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ आणि ‘आकाशवाणी’ सारख्या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी ओळखले जाते. लव आता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिकेत असलेल्या त्याच्या आगामी चित्रपटासाठी शूटिंग करत आहे.

हे देखील वाचा