सुष्मिताला ‘गोल्ड डिगर’ म्हणणाऱ्यांना एक्स बॉयफ्रेंड विक्रम भटांनी झाप झाप झापलं; म्हणाले, ‘ती जगातली…’

0
62
Sushmita-Sen-And-Vikram-Bhatt
Photo Courtesy : Instagram/sushmitasen47 & vikrampbhatt

भारताची पहिली विश्वसुंदरी सुष्मिता सेन सोशल मीडियावर सध्या बरीच चर्चेत आहे. ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. अनेकांनी या जोडीचे नाते पटत नाहीये, तर कोणी सुष्मिताला ‘गोल्ड डिगर’ म्हणत आहे. तिला ‘पैशांचा विचार करणारी’ असेही म्हटले जात आहे. १४ जुलैचा तो दिवस होता आणि आजचा हा दिवस आहे, पण लोक त्यांच्या नात्याबद्दल बोलणं काही थांबवत नाहीत. सुष्मिता-ललित मोदी यांनी सुद्धा ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे. बऱ्याच सेलेब्रिटींनी सुष्मिताला ‘गोल्ड डिगर’ म्हटल्याचा विरोध केला आहे. यातच आता भारतीय चित्रपट निर्माते विक्रम भट्ट यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

काय म्हणाले विक्रम भट्ट
एकेकाळी विक्रम भट्ट (Vikram Bhatt) आणि सुष्मिता सेन (Sushmita Sen) यांनी एकमेकांना डेट केले होते. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत विक्रम भट्ट यांनी जे सुष्मिता सेनला ‘गोल्ड डिगर’ म्हणत आहेत, त्यांना चांगलेच सुनावले आहे. विक्रम भट्ट यांनी त्यांच्या एक्स गर्लफ्रेंडला पाठिंबा देत म्हटले आहे की, “सुष्मिता गोल्ड डिगर नाही, तर लव्ह डिगर आहे.” त्यांच्यानुसार सुष्मिता जगातील शेवटची व्यक्ती असेल जी, पैशांसाठी एखादं नातं बनवेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikram Bhatt (@vikrampbhatt)

सुष्मिताला ‘गोल्ड डिगर’ म्हणणाऱ्यांना फटकारले
विक्रम भट्ट म्हणाले की, “कोणाच्याही प्रेमात पडण्याआधी त्याचा बँक बॅलेंस पाहणारी सुष्मिता नक्कीच शेवटची व्यक्ती असेल. माझ्याकडे काहीच पैसे नव्हते. मी गुलाम दिग्दर्शित करत होतो, पण माझ्याकडे पैसे नव्हते. मी कधीही विसरणार नाही की, मला युएसला घेऊन जाणारी सुष्मिता ही पहिलीच व्यक्ति होती. तीनेच माझा सगळा खर्च केला होता. जेव्हा आम्ही लाॅस एंजेलिसमध्ये पोहोचलो, तेव्हा तिथे एक लिमोजिन कार (Limousine) होती. मी एकदम चकित झालो होतो. ती म्हणाली की, तिला माझी युएसमधली एंट्री स्पेशल बनवायची होती.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

सुष्मिताला सोन्याचा नाही, तर प्रेमाचा शोध
विक्रम भट्ट यांनी तिचं समर्थन करत म्हटले आहे की, “मला वाटतं लोकांच्या आयुष्याची मजा घेणे, हा एक एंटरटेन्मेंटचा भाग बनला आहे. जेव्हा करीनाने सैफसोबत लग्न केलं, तेव्हा त्यांना ट्रोल करण्यात आलं. सुष्मिता सोन्याला नाही, तर प्रेमाला शोधत असते.”

दोन वर्षे चालू होतं विक्रम-सुष्मिताचं अफेअर
विक्रम भट्ट यांनी सांगितलं की, त्याचं सुष्मितासोबत बोलणं होत नाही. ते म्हणाले, “मागच्या वेळी २००६-२००७ मध्ये आम्ही भेटलो होतो, तेही जवळपास जवळपास १५ वर्षांपूर्वी. जसं तिने मला ट्रीट केलं आहे, मी ते कधीच विसरणार नाही. ती कधीच गोल्ड डिगर नसू शकते.”

विक्रम- सुष्मिता जवळपास २ वर्षे एकमेकांना डेट केलं. १९९६मध्ये दोघांचेही रस्ते वेगळे झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

खरं की काय! अजयच्या चित्रपटात काजोल करणार शाहरुखसोबत रोमान्स?, एका क्लिकवर घ्या जाणून

अरर! शाहरुख खानचा ‘हा ‘फोटो झाला सोशल मीडियावर व्हायरल, भडकले चाहते

अंतराची कातील अदा अन नेटकरी झाले फिदा! अभिनेत्री योगिता चव्हाणच्या बोल्ड फोटोंनी लावले नेटकऱ्यांना वेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here