Tuesday, June 25, 2024

पॅपराझींसमाेर ढसाढसा रडताना राखीने स्वतःलाच मारली चापट, काय म्हणाली? एकदा पाहाच

गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत माेठ्या प्रमाणात चर्चेत आहे. अशातच राखीचा लेटेस्ट व्हिडिओ समाेर आला आहे, ज्यामध्ये ती पती आदिल खान दुर्रानीबद्दल अनेक खुलासे करत आहे. यासाेबतच राखी व्हिडिओमध्ये स्वत: ला मारहाण करतानाही दिसत आहे. काय संपूर्ण प्रकरण? चला जाणून घेऊया…

राखी सावंत (rakhi sawant) हिने अलीकडेच आदिल खान दुर्रानी (adil khan durrani) याच्याविरूद्ध तक्रार हाेती, ज्यामुळे त्याला तुरूंगात नेले. अशातच जेव्हा राखी आदिलला भेटायला तुरूंगात गेली, तेव्हा राखीने सांगितले की, “आदिल तिला धमकावत असून तिच्याशी अत्यंत उद्धटपणे बाेला. ताे म्हणाला, ‘मी तुरुंगात खूप माेठ्या डाॅनला भेटलाे आहे, त्यामुळे तुझं काय करेल याचा विचार कर.'” असे राखीने सांगितेले.

साेशल मीडियावर व्हायरल हाेत असलेल्या व्हिडिओमध्ये राखी तिच्या लग्नाबद्दल अस्वस्थ झाली असून ढसाढसा रडत आहे. यादरम्यान राखी अनियंत्रित झाली आणि स्वत:लाच मारहाण करु लागली. राखी रडत म्हणाली,” मी त्याच्यावर का विश्वास ठेवला … मी त्याच्यावर का प्रेम केले …मी असे करायला पाहिजे नव्हते.” यासाेबतच राखी म्हणाली की, “मी फ्रीजमध्ये जाण्यापासून वाचली. कारण, आदिलने सर्व नियाेजन केले हाेते. ”

 

View this post on Instagram

 

A post shared by Showbiz Spy (@showbizspy_)

राखी सावंत आजकाल खूप कठीण परिस्थीतून जात आहे. तिने काही दिवसांपुर्वीच सोशल मीडियावर तिचे आणि आदिलचे फाेटाे शेअर करुन त्यांचे लग्न झाल्याचे उघड केले हाेते. परंतु आदिलने हे लग्न लपविण्यासाठी दबाव आणला. ज्यानंतर हा वाद दररोज वाढतच राहिला. एवढेच नाही, तर राखीने आदिलवर मारहाणीचा दावा ही केला आहे.(dramaqueen rakhi sawant crys in front of media and says main bhi fridge me jaane wali thi)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
यशस्वी दिग्दर्शक होण्याआधी सुरज बडजात्या करायचे ‘हे’ काम, अनुपम खेर यांनी केला खुलासा

हे तर पाहिलंच पाहिजे! ‘शाळा’ फेम अभिनेत्री केतकी माटेगावकरचा लहानपणीचा ‘छडी लागे छमछम’ गाणं गातानाचा व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा