Tuesday, September 26, 2023

श्वास रोखून धरा! 4 वर्षांनंतर ‘पूजा’ पुन्हा लावणार प्रेक्षकांना वेड, ‘Dream Girl 2’च्या ट्रेलरचा धुमाकूळ

बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना याचा 2019 साली प्रदर्शित झालेला ‘ड्रीम गर्ल‘ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. तसेच ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटातील गाण्यांनी देखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. तेव्हापासून प्रेक्षक ‘ड्रीम गर्ल 2’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते आणि आता ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आयुषमान खुराना पुन्हा एकदा ‘पूजा’ पात्राच्या लूकमध्ये दिसत आहे. तसेच या दुसऱ्या भागात पूजासमोर अनेक नवीन आव्हाने असल्याचे दिसत आहे.

‘ड्रीम गर्ल 2’ (Dream Girl 2) सिनेमाच्या ट्रेलरची सुरुवातच अशी धमाकेदार आहे की, प्रेक्षक दोन-तीन वेळा ट्रेलर पाहिल्याशिवाय राहणार नाहीत. खासकरून आयुषमान खुरानाच्या (Ayushman Khurrana) चाहत्यांमध्ये हा ट्रेलर पाहिल्यानंतर उत्सुकता अनेक पटींनी वाढली असेल. या चित्रपटात आयुषमान खुराना करमवीर सिंगची भूमिका करत आहे.

‘ड्रीम गर्ल 2’च्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की, करमवीरचे वडील वायफळ खर्च करुन डोक्यावर कर्ज वाढवून ठेवतात. दुसरीकडे करमवीरचे ज्या मुलीवर प्रेम आहे तिच्या वडिलांनी लग्नापूर्वी करमवीरसमोर अजब अट ठेवली आहे. ‘एक चांगली नोकरी आणि सहा महिन्याच्या आधी अकाऊंटला 25 लाख रुपये जमा कर, तरंच तुमचे लग्न शक्य आहे.’ करमवीर आणि त्याच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती ठीक नसते. त्यामुळे करमवीरचे मित्र त्याला पुन्हा पूजाचे रुप धारण करुन डान्स बारमध्ये काम करण्यास सांगतात. पूजा (Pooja) बारमध्ये डान्स करते आणि एक श्रीमंत घरातील मुलगा तिच्या प्रेमात पडतो. लग्नासाठी त्याच्या घरातील कुटुंबीय 50 लाख रुपये द्यायला तयार असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

ट्रेलर इतका मजेशीर आहे की, आयुषमान पूजाच्या व्यक्तिरेखेत रंग भरत आहे, तर अन्नू कपूर आणि अभिषेक बॅनर्जी देखील पूजाच्या प्रेमात वेडे झाले आहेत. चित्रपटाचे पोस्टर शेअर करत आयुषमाने “ट्राफिक जॅम होणार कारण चार वर्षांनी ड्रीम गर्ल पूजा येणार…” असे कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

या चित्रपटात आयुषमान खुराना व्यतिरिक्त, अन्नू कपूर आणि विजय राज, अनन्या पांडेसह चित्रपटातील सर्व स्टारकास्ट त्यांच्या कॉमेडीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार यात कसलीच शंका नाही. हा चित्रपट येत्या 25 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. (Dream Girl 2 Trailer Actor Ayushmann Khurrana again play Pooja)

हेही वाचा-
वयाने 39 वर्षे मोठ्या रजनीकांत यांची हिरोईन बनण्यावर तमन्नाचे विधान; म्हणाली, ‘मी तर 60व्या वयातही…’
‘शेतीच्या कामाला बैल, कष्टाच्या कामाला गाढव आणि विकासाच्या कामाला *** लागतो’, सयाजी शिंदेचा व्हिडिओ व्हायरल

 

हे देखील वाचा