बॉयफ्रेंडसोबत सेटल होण्यासाठी एमा वॉटसन ठोकतेय अभिनय कारकीर्दीला रामराम? मॅनेजरने दिली महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया

Emma Watson Manager Responds To Rumours Says She Has No Plans To Retire


‘हॅरी पॉटर’ या चित्रपटाचे नाव घेतले की, सर्वांच्या मुखात सर्वप्रथम नाव येते ते ‘एमा वॉटसन’. एमाने आपल्या सहजसुंदर अभिनयाने करोडो चाहत्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. एमा सोशल मीडियावर फार सक्रिय राहत नाही. नुकतेच असे वृत्त येत आहे की, एमा वॉटसन आपल्या अभिनय कारकीर्दीला अलविदा करणार आहे. यानंतर तिचे चाहते खूपच भावुक झाले आहेत. परंतु असे असले तरीही, एमाच्या मॅनेजरने याबाबत महत्त्वपूर्ण  प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री एमाचा मॅनेजर जेसन वेनबर्गने याबाबत प्रतिक्रिया देत म्हटले की, “एमाचे सोशल मीडिया अकाउंट निष्क्रिय आहे. तिचे करियअर नाही. ती आपल्या अभिनय कारकीर्दीला अलविदा करत नाहीये.”

खरं तर माध्यमातील वृत्तानुसार, रविवारी (२८ फेब्रुवारी) असा दावा केला होता की, अभिनेत्री एमा आपला बॉयफ्रेंड लिओ रॉबिंटनसोबत आपले नाते आणि कुटुंब पुढे नेण्यासाठी अभिनय कारकीर्दीला अलविदा करत आहे.

एका अहवालात असे लिहिले होते की, एमा अंडरग्राऊंड झाली आहे आणि ती लिओसोबत सेटल होत आहे. कदाचित तिला आता कुटुंबावर लक्ष द्यायचे आहे. तरीही, एमाच्या मॅनेजरच्या प्रतिक्रियेनंतर चाहत्यांनी अभिनेत्रीला ट्रिब्यूट दिला आहे.

चाहते तिच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीची प्रशंसा करत आहेत. इतकेच नाही, तर ट्विटरवर तिचे नावही ट्रेंड होऊ लागले आहे. एमा शेवटची सन २०१९ मध्ये ‘लिटल वुमन’ चित्रपटात झळकली होती. तिने या चित्रपटात मेग मार्चची भूमिका साकारली होती.

यापूर्वी ती ‘द सर्कल’ आणि ‘डिझनी ब्युटी एँड द बीस्ट’च्या लाईव्ह ऍक्शन व्हर्जनमध्ये दिसली होती.

मागील वर्षी एमाने ट्रान्सजेंडरवर आपले मत मांडल्यानंतर ती चर्चेचा विषय ठरली होती. तिने म्हटले होते की, आपल्या ओळखीवर प्रश्न न विचारता त्यांना जगण्याचा अधिकार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आहा! बॉलिवूड कपल रणबीर- आलिया करणार होते सर्वांसमोर ‘लिप- लॉक’, पाहा त्यांचा रोमँटिक व्हिडिओ

-बॉलिवूड अभिनेत्री उर्वशीने कापले १० किलो कांदे, चारच तासात व्हिडिओला मिळाले १९ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज

-अबब! उर्वशी रौतेलाचा ५० लाखांचा बोल्ड अँड ब्युटीफुल लुक, पाहा या लूकचे दोन खास व्हिडीओ


Leave A Reply

Your email address will not be published.