इंटरनेट सेन्सेशन बनलेली २० वर्षीय जन्नत झुबेर आहे ‘इतक्या’ कोटींची मालकीण; किंमत वाचून फिरतील डोळे


मनोरंजन क्षेत्रात यश मिळवणे म्हणजे फक्त मेहनतीचाच परिणाम नाही, तर सोबत नशिबाची साथ देखील तितकीच आवश्यक असते. याची अनेक उदाहरण आपल्याला या इंडस्ट्रीमध्ये पाहायला मिळतील. काही कलाकार हे प्रतिभा असूनही त्यांना पाहिजे तेवढे यश मिळत नाही किंवा मिळवता येत नाही. दुसरीकडे काही कलाकार असे आहेत ज्यांच्याकडे प्रतिभा नाही मात्र ते आज यशाच्या सर्वोच्च शिखरावर आहेत. या क्षेत्रात बालकलाकार म्हणून काम करणारे अनेक कलाकार मोठे झाल्यावर मुख्य भूमिका निभावण्याच्या उद्देशाने पुन्हा या क्षेत्रात येतात. सर्वांनाच ही संधी मिळते असे नाही, आणि मिळालेल्या संधीत यश मिळेल असे नाही. मोजकेच असे कलाकार आहेत, जे बालकलाकार म्हणून तर यशस्वी होतातच. मात्र, मोठे झाल्यावरही त्यांना अमाप लोकप्रियता मिळते. अशीच एक अभिनेत्री आहे जन्नत झुबेर.

बालकलाकार म्हणून जन्नतने ‘दिल मिल गये’ या मालिकेतून पदार्पण केले. त्यानंतर कलर्स वरील ‘फुलवा’ मालिकेने तिला तुफान यश मिळवून दिले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. बालकलाकार म्हणून काम केल्यानंतर जन्नतने ‘तू आशिकी’ मालिकेतून मुख्य भूमिका साकारत पदार्पण केले. जन्नतने मालिकेसोबतच अनेक चित्रपटांमध्ये देखील भूमिका साकारल्या. टेलिव्हिजन इंडस्ट्री गाजवत असताना जन्नत सोशल मीडिया देखील गाजवायला लागली.

सन २००९ मध्ये बालकलाकार म्हणून पदार्पण करणारी जन्नत आज कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणारी जन्नत नेहमी तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. जन्नत एक अभिनेत्री असण्यासोबतच एक मॉडेल आणि परफॉर्मरही आहे. जन्नतला संपूर्ण जगात तरुण मंडळी भरपूर फॉलो करतात. तिच्या सोशल मीडियावर फॉलोवर्सची संख्या देखील लाखोंच्या घरात आहे. जन्नत आज केवळ २० वर्षांची आहे. तरीही ती या क्षेत्रातली सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

caknowledge.com च्या एका रिपोर्टनुसार जन्नत झुबेर ७ कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. जन्नतने ही सर्व संपत्ती तिच्या क्षेत्रात जबरदस्त मेहनत करून कमावली आहे. अतिशय कमी वयात जन्नत एक यशस्वी अभिनेत्री आहे. जन्नत अभिनयाशिवाय अनेक मोठमोठ्या ब्रॅंडच्या जाहिराती करते. या जाहिरातींमुळे तिच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झाली आहे.

जन्नतला काही काळापूर्वी प्रसिद्ध टिकटॉक स्टार फैजल शेखसोबत पाहिले होते. एका रिपोर्टनुसार, दोघं एकमेकांना डेट करत आहे असे समजले होते. मात्र, काही काळाने फैजलने स्पष्ट केले की, ते दोघं फक्त चांगले मित्र आहेत जास्त काहीच नाही.

जन्नतने ‘हार जीत’, ‘फियर फाईल्स’, ‘एक थी नायका’, ‘बेस्ट ऑफ लक निक्की’, ‘महाराणा प्रताप’, ‘महा कुंभ’, ‘सावधान इंडिया’, ‘कोड रेड’, ‘गुमराह’, ‘तुझसे नाराज नही जिंदगी’, ‘शनी’, ‘तू आशिकी’, ‘आप के आ जाने से’, ‘खतरा खतरा’ यांसारख्या मालिकेमध्ये काम करून लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.