Saturday, April 18, 2026
Home हॉलीवूड प्रसिद्ध पॉप स्टार रिहानाच्या बॉयफ्रेंडला अटक, लावला जातोय ‘हा’ गंभीर आरोप

प्रसिद्ध पॉप स्टार रिहानाच्या बॉयफ्रेंडला अटक, लावला जातोय ‘हा’ गंभीर आरोप

पॉप स्टार रिहानाचा (Rihanna) बॉयफ्रेंड रॅपर ASAP रॉकीला बुधवारी (२० एप्रिल) लॉस एंजेलिस विमानतळावरून अटक करण्यात आली. त्याच्यावर २०१९ मध्ये गोळीबार केल्याचा आरोप आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ३३ वर्षीय रॅपरला नुकतेच विमानतळावर अटक करण्यात आली, जेव्हा तो लॉस एंजेलिसहून बार्बाडोसला त्याची प्रेग्नेंट गर्लफ्रेंड रिहानासह सुट्टीवर आला होता.

रॅपरचे खरे नाव राकिम मेयर्स आहे. त्याच्यावर ६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:१५ वाजता व्हिस्टा डेल मार आणि सेल्मा अव्हेन्यू दरम्यान गोळीबार केल्याचा आरोप आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोळीतून बचावलेल्या पीडितेने पोलिसांना सांगितले की, रॉकीने दोन लोकांसोबत मिळून गोळीने त्यांच्यावर हल्ला केला होता. पीडितेने सांगितले की, रॉकीने त्यांच्यावर चार गोळी झाडल्या, त्यापैकी एक गोळी तिच्या डाव्या हाताला लागली. त्या व्यक्तीच्या या आरोपांनंतर पोलीस त्याच्या तपासात गुंतले होते, पण याला कधीच सार्वजनिक करण्यात आले नाही. (famous singer rihanna s boyfriend asap rocky arrested accused of shooting in 2019)

रिहानाने चाहत्यांना फेब्रुवारीमध्ये ती गर्भवती असल्याची माहिती दिली होती. ती लवकरच आई होणार आहे. नुकतीच अशी बातमी आली होती की, रॉकीने रिहानाची फसवणूक केली आणि शू डिझायनर अमिना मुअद्दीशी लग्न केले. परंतु लवकरच या अफवांचा पर्दाफाश झाला. अमिनाने इन्स्टाग्रामवर हे दावे फेटाळून लावले होते.

रिहानाने तिच्या परिवारबाबत तिची इच्छा व्यक्त केली होती. तिला मागील अनेक दिवसापासून आई व्हायचे होते. आता ती तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार असल्याने ती खूपच उत्सुक आहे. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर वेगळच तेज आलेले दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा