विरुष्कापासून ते सैफिनापर्यंत, पाहा चाहत्यांनी बॉलीवूडमधील जोड्यांना काय दिलीत टोपन नावं


बॉलिवूडमधील अनेक कपल आपल्या अभिनय क्षेत्राबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील त्यांच्या लव्ह रिलेशनमुळे खूपच चर्चेत आले. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी लग्न केल्यानंतर चाहत्यांनी त्या दोन्ही कलाकारांच्या नावाला घेऊन एक नाव बनवले आहे आणि आता सर्वत्र त्यांच्या जोडीला त्याच नावाने ओळखले जाते. चला तर जाणून घेऊया अश्याच काही बॉलिवूडमधील जोड्यांबद्दल

सैफिना
या यादीत सगळ्यात पाहिले नाव येते ते म्हणजे सैफ अली खान आणि करिना कपूर यांचे. त्यांना सगळे प्रेक्षक ‘सैफीना’ या नावाने ओळखतात. त्याची ऑन आणि ऑफस्क्रीन लव्ह स्टोरी सगळ्यांनाच खूप भावते. त्या दोघांना सगळे रॉयल कपल असे देखील म्हणतात.

विरुष्का
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि स्टार क्रिकेटर विराट कोहली यांची जोडी सुपरहिट जोडीपैकी एक मानली जाते. अनुष्का आणि विराटमधील प्रेम बघून सगळ्यानी त्यांना ‘विरुष्का’ हे नाव दिले

शामिरा
अभिनेता शाहीद कपूर आणि मिरा राजपूत यांची केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना खूपच आवडते. सगळेजण त्यांना ‘शामिरा’ या नावाने संबोधतात. मिरा जरी चित्रपट सृष्टीतील नसली तरी तिचा देखील मोठा फॅन फॉलोवर्स आहे.

अभीएश
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांच्या जोडीला सगळ्यांनी ‘अभीएश’ हे नाव दिले आहे. या दोघांनी ऑनस्क्रीन देखील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

रालिया
बॉलिवूड मधील लव बर्ड्स अशी ज्यांची ओळख आहे ते आलिया भट्ट आणि रणबीर कपूर. या दोघांनी अजुन लग्न नाही केले, परंतु हाती आलेल्या बातमीनुसार हे दोघेही लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. त्यांच्या जोडीला सगळेजण ‘रालिया’ या नावाने ओळखतात.

निकयांका
ग्लोबल अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनस ही जोडी नेहमीच प्रेक्षकांच्या चर्चेत असते. या जोडीमध्ये जरीही वयाचं अंतर असलं तरीही त्यांच्यातील प्रेम सगळ्यांनाच दिसतं. त्यांना सगळ्यांनी ‘निकयांका’ हे नाव दिले आहे.

दीपविर
बॉलिवूडमधील सर्वात रोमँटिक जोडी म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण. यांच्यातील प्रेम सगळ्याचं खूप आवडतं. यांना चाहते दीपविर या नावाने ओळखतात.

 


Leave A Reply

Your email address will not be published.