चॅडविक बोसमॅनच्या पुण्यतिथीनिमित्त भावुक झाले चाहते; पोस्ट शेअर करत लिहिल्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या आठवणी

हॉलिवूड अभिनेता चॅडविक बोसमॅनची शनिवारी (२८ ऑगस्ट) पहिली पुण्यतिथी होती. ‘ब्लॅक पँथर’ फेमच्या या स्टारला मार्वलसह हॉलिवूडच्या सर्व मोठ्या सेलिब्रिटींनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याच्या पहिल्या पुण्यतिथीवर त्याची आठवण काढून, सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित फोटो आणि आठवणी शेअर केल्या आहेत. गेल्या वर्षी चॅडविक बोसमॅन याचे कर्करोगाने निधन झाले आहे. त्याने चार वर्षे कर्करोगाशी लढा दिला होता, मात्र तो हा लढा हरला आणि २८ ऑगस्ट, २०२० रोजी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला.

मार्वल स्टुडिओने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर दिवंगत चॅडविकचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, “आमचे मित्र, आमची प्रेरणा आणि आमच्या राजाचा  सन्मान करत आहोत.” ‘ब्लॅक पँथर’ चित्रपटात काम केलेली अभिनेत्री लुपिता न्योंगओ हिने देखील चॅडविकसोबतचा एक फोटो शेअर केला आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली.

 

लुपिता न्योंगओने लिहिले की, “मला माहित नव्हते की, मला त्याचे हसणे आणि शांत बसणे या दोन्ही गोष्टी एकत्र आठवाव्या लागतील. मी करत आहे… मी करत आहे. त्याच्या निधनाच्या एक वर्षानंतर देखील चॅडविक माझ्या मनात जीवंत आहे.” लुपिताने जो फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये लुपिता आणि चॅडविक एका गॅलरीमध्ये उभे आहेत. ते दोघेही कोणत्यातरी गोष्टीवर खूप जोरात हसत आहे.

‘ऍव्हेंजर्स’ सिरीजमध्ये हल्क आणि ब्रूस बॅनरची भूमिका साकारणाऱ्या मार्क रुफोलोनेही त्याची आठवण काढली. त्याने चॅडविकचा फोटो शेअर करत लिहिले की, “विश्वास बसत नाही की, वेळ इतक्या वेगाने जातो. मी आज तुझ्याबद्दलच विचार करत आहे.”

अभिनेता जोश गॅडने लिहिले की, “एक वर्षानंतर, असा एक दिवस जात नाही, जेव्हा मला त्रास होत नाही. पण अंधारात तो नेहमी प्रकाशाची आठवण करून देतो. तो या ग्रहावरील देवदूत होता. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि पहिल्यापेक्षा तुमची जास्त आठवण येते.”

तुम्हालाही हे जाणून आश्चर्य वाटेल की, कर्करोगाशी लढाई दरम्यान त्याने ‘ब्लॅक पँथर’ आणि ‘ऍव्हेंजर’ सीरिजमधील शेवटच्या दोन मोठ्या चित्रपटांसह, अनेक चित्रपटांचे शूटिंग केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनयात येण्यापूर्वी ‘हे’ काम करायची श्रुती हासन; म्हणाली, ‘कोणालाही माहित नव्हते की…’

-Bigg Boss OTT: लाजून लाल झाली शमिता, जेव्हा करणने ‘हॉटनेस’वर प्रश्न विचारताच राकेश म्हणाला…

-‘टायगर ३’साठी कॅटरिना कैफ रशियाला रवाना; स्टंट सीन शूट करण्यासाठी घेतीये प्रचंड मेहनत