Friday, April 19, 2024

वयाच्या सत्तेचाळीशीतही हॉट मलायका आहे इतकी फिट! जाणून घ्या तिच्या डाएटचा कानमंत्र

अनेकांसाठी फिटनेस ही त्यांची प्राथमिकता असते. लोक कितीही व्यस्त असले तरीही ते स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी थोडा वेळ घेतात. आपले वजन आणि फॅट कमी करण्यासाठी जिमला जाण्याचा विचार करत असतात. पण जिमचे पैसे भरलेले असून सुद्धा वेळेअभावी त्यांना मिळत नाही. जीवनशैलीत वेगवेगळे बदल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि अपुरी झोप यामुळे नेहमीच त्यांचे वजन वाढण्याची समस्या उद्भवत असते. यातच बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या आपल्या फिटनेसविषयी नेहमी चर्चेत असतात. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री ‘मलायका अरोरा.’

सिनेअभिनेत्री आणि फिटनेस क्वीन मलायका अरोरा ही आपल्या फिटनेसमुळे बऱ्याचदा चर्चेत असते. ती आपल्या फॅशन आणि सौंदर्याच्या बाबतीत नेहमीच लाईमलाईटचा भाग असते. त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे वयाच्या ४७ व्या वर्षीही ती आपल्या फिटनेस विषयी चर्चेत राहिली आहे. बऱ्याचदा ती योगा आणि जिम सेशन्सच्या बाहेर स्पॉट केली जाते. तिचा लूक बऱ्याचदा कॅज्युअल असतो, तर काहीवेळा एकदमच हॉट. याशिवाय ती सोशल मीडियावर फार सक्रिय असते. अनेकवेळा आपल्या चाहत्यांना तंदुरुस्त राहण्यासाठी प्रेरित करत असते.

मलायकाने सन २०२१ मध्ये आपल्या फिटनेसवर फारच लक्ष केंद्रित केले आहे. आपल्या एका मुलाखती दरम्यान डाएटबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. तिचे म्हणणे आहे की, योगामुळे आपल्याला योग्य मानसिकता आणि सामर्थ्याने रोजचे जीवन जगण्याची शक्ती मिळते. योगासाठी प्रत्येक वेळी नवीन आसन करण्याचा प्रयत्न करणे महत्वाचे नाही. पण इतके सगळे उद्योग करण्यापेक्षा जर तुम्ही  घरच्याघरी स्वत:साठी थोडासा वेळ काढून व्यायाम केला, तर वजन कमी करण्याची तुमची समस्या दूर होऊ शकते. सोबतच योगा, धावणे, चालणे आणि बऱ्याच शारीरिक हालचालींद्वारे आपण आपले फिटनेस नीट ठेवू शकतो. त्यातच आपल्या फिटनेससाठी डॉक्टरांचा आणि आहारतज्ज्ञ यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, असे तिचे म्हणणे आहे.

मलायका कोणत्याही विशिष्ट आहाराचे पालन करत नाही. तिच्या शरीराला ज्या खाद्यपदार्थाची आवश्यकता आहे ते ती खाते, कोणतेही पदार्थ खाण्याबाबत ती टाळाटाळ करत नाही.

तिने आपला रोजचा दिनक्रम शेयर केला आहे, ज्यात ती म्हणते की, “आपल्या दिवसाची सुरुवात योग्य सत्राने करा. त्यानंतर चालायला जाणे, पोहणे, धावणे यांसारख्या क्रियेचा अवलंब तुम्ही करू शकता. प्रयत्न इतकाच असुदेत की दिवसातून कमीत कमी ३० आणि जास्तीत जास्त ६० मिनिटे हा व्यायाम झालाच पाहिजे.”

जे लोक फिटनेसची सुरुवात नव्याने करू इच्छितात त्यांच्यासाठी देखील तिने महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. फिटनेस वर आपले लक्ष्य केंदित करणे गरजेचे. त्यासाठी एखाद्या तज्ज्ञांशी संपर्क साधावे. आपल्या आहारात अचूक बदल करणे गरजेचे आहे. आपले शरीर, आत्मा आणि मनाचा अचूक समतोल राखावा जेणेकरून तुमचे मन शांत होईल. फिटनेस प्रशिक्षणासाठी ब्रॅण्डेड बूट खरेदी करा. जो काही आपण फिटनेसचा प्लॅन आखणार आहोत त्यावर दुर्लक्ष करू नका. या गोष्टींचा उल्लेख तिने यात केला.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा

-शर्टलेस सलमान खानसोबतचा फोटो शेअर करून अर्पिता खानने दिला जुन्या आठवणींना उजाळा

-बंदूक घेऊन सपना चौधरी बनली ‘गुंडी’, गाण्याचा टिझर रिलीझ

-हरियाणवी ‘डान्सिंग क्वीन’ सपना चौधरी ‘नकटो’ गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला! काही तासांतच व्हिडिओला मिळाले लाखो व्ह्यूज

हे देखील वाचा