गीता बसरा- हरभजन सिंगने जाहीर केले त्यांच्या बाळाचे नाव; सोबतच गोड फोटो शेअर करून दाखवली पहिली झलक


सध्या ग्लॅमर जगात अतिशय आनंदाचे वातावरण आहे. एकीकडे व्यायसायिकदृष्ट्या विचार केला, तर कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने चित्रपटांच्या शूटिंगला सुरुवात झाली. सोबतच सर्वांना आशा आहे की, असाच कोरोनाचा संसर्ग कमी झाला तर, लवकरच चित्रपटगृह उघडण्याच्या देखील बऱ्याच शक्यता आहेत. शिवाय कलाकारांच्या वैयक्तिक जीवनाचा विचार केला तर लक्षात येईल की, २०२१ हे वर्ष कलाकारांसाठी खूपच चांगले ठरले आहे. या वर्षी अनेक मोठ्या कलाकारांच्या घरी नव्या पाहुण्यांचे आगमन झाले. यातच अभिनेत्री गीता बसरा आणि क्रिकेटर हरभजनसिंग यांचे नाव देखील सामील झाले आहे.

गीता आणि हरभजन यांनी नुकतेच त्यांच्या दुसऱ्या बाळाचे स्वागत केले. या दोघांना १० जुलैला मुलगा झाला. याआधी या जोडप्याला एक सुंदर मुलगी असून तिचे नाव हिनाया आहे. हिनाया सध्या ५ वर्षांची आहे. नुकतेच या दोघांनी त्यांच्या बाळाचा पहिला फोटो आणि बाळाचे नाव जाहीर केले आहे. हरभजन आणि गीता यांनी त्यांच्या मुलाचे नाव जोवान वीर सिंग प्‍लाहा ठेवले आहे. (geeta basra showed the first glimpse of the son)

हे नाव सोशल मीडिया अकाऊंट वरून जाहीर करत, गीताने एक गोड फोटो देखील शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “हीरचा वीर..जोवन वीर सिंग प्लाहा.” हा फोटो आहे हिनाया आणि जोवानचा. या फोटोमध्ये हिनायाने तिच्या छोट्या भावाला मांडीवर धरले असून ती प्रेमाने त्याच्याकडे बघत आहे. मात्र या फोटोमध्ये जोवानचा चेहरा दिसत नाही. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, फॅन्ससोबतच कलाकार आणि क्रिकेटर गीता आणि हरभजनला शुभेच्छा देत आहे.

सुरुवातीला गीता आणि हरभजन यांनी डेट केल्यानंतर, त्यांनी २९ ऑक्टोबर २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली होती. गीताने चित्रपटांमध्ये तिचे करिअर सुरु केले. तिने ‘दिल दे दिया’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात इमरान हाश्मीसोबत ती भूमिकेत दिसली होती. त्यानंतर ती बर्‍याच चित्रपट आणि म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली आहे. मात्र तिला अपेक्षित यश मिळाले नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कुंद्रा प्रकरणाबाबत राखी सावंत झाली व्यक्त; म्हणाली, ‘त्यांनी मला…’

राहुल- दिशाला आशीर्वाद देण्यासाठी किन्नर पोहचले त्यांच्या घरी; नवदाम्पत्यासह डान्स करून केली ‘ईतकी’ मोठी मागणी

-शोएब इब्राहिमचे वडील ब्रेन स्ट्रोकमुळे रूग्णालयात दाखल; दीपिका कक्करने केली सासऱ्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना


Leave A Reply

Your email address will not be published.