Friday, March 29, 2024

गुंजन सिंग अन् शिल्पी राजचे नवीन गाणे प्रदर्शित; एकाच दिवसात मिळाले ४ लाख हिट्स

सध्या सगळीकडेच भोजपुरी गाणी धमाल करताना आपल्याला दिसतात. या गाण्यांनी विशिष्ट प्रदेशापुरते मर्यादित न राहता संपूर्ण देशात त्यांची वेगळी ओळख तयार केली आहे. हटके आणि लक्षात राहतील असे शब्द लक्षवेधी संगीत आणि भडक व्हिडिओ कदाचित या त्रिसूत्रीमुळेच ही भोजपुरी गाणी नेहमीच हिट होताना आपल्याला दिसतात. या गाण्यांना वेगळी ओळख मिळवून देण्यात गायकांचा आणि कलाकारांचा मोठा हात आहे. कोणतेही भोजपुरी गाणे प्रदर्शित केल्यानंतर ते हिट होणारच हे आधीच गृहीत धरले जाते.

नुकतेच भोजपुरी स्टार गायक असलेल्या गुंजन सिंग आणि शिल्पी राज यांचे नवीन धमाकेदार गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याचे नाव आहे, ‘गलीया गलीया होवे डगरपूजिया.’ याआधी देखील या जोडीचे अनेक गाणे प्रदर्शित झाले असून, सर्वच गाणी तुफान हिट झाली आहेत. आता नव्याने प्रदर्शित झालेले ‘गलीया गलीया होवे डगरपूजिया’ हे गाणे देखील या दोघांच्या हिट लिस्टमध्ये जोडले गेले आहे. नुकतेच प्रदर्शित झालेल्या या गाण्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. (Gunjan Singh Shilpi Raj New Vivah Geet Release On Youtube)

‘गलीया गलीया होवे डगरपूजिया’ हे गाणे एक विवाह गीत असून, गुंजन सिंग म्युझिक वर्ल्डच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आले आहे. प्रदर्शनानंतर काही काळातच या गाण्याला हजारो व्ह्यूज मिळाले आहे. या गाण्यात गुंजन सिंग नवरदेवाच्या रूपात दाखवण्यात आला असून, त्याच्या लग्नाचे सर्व विधी संपन्न होताना दिसत आहेत. यात त्याला हळद लावली जात आहे आणि बँडच्या तालावर तो जोरदार थिरकतानाही दिसत आहे, तर अभिनेत्री महिमा या गाण्यातही नेहमीसारखा तिचा जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

या गाण्याला एकाच दिवसात ४ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर ९ हजारांपेक्षाही अधिक लाईक्स आणि शेकडो कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

हे गाणे अमन अलबेला यांनी लिहिले असून, संगीत शंकर सिंग यांनी दिले आहेत. तसेच या गाण्याची सर्व शूटिंग एका गावात करण्यात आल्याचे आपल्याला दिसत आहे.

गुंजन सिंग आणि शिल्पी यांचे ‘दुल्हा चाही ट्रक ड्राईबारवा ए बाबा’ हे गाणे गुंजन सिंग एंटरटेनमेंटच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्याला गुंजन सिंग आणि शिल्पी राज यांनी गायिले असून, अमन अलबेला यांनी लिहिले आहे, तर संगीत आर्या शर्माने दिले आहे. हे गाणे देखील मोठ्या प्रमाणत इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच ना! मिलिंद सोमण यांच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण; रोमँटिक फोटो शेअर करून दिल्या पत्नीला शुभेच्छा

-अली गोनीकडे सध्या नाहीये कोणताच प्रोजेक्ट; वाढलेलं वजन आहे का यामागचं कारण??

-‘मी अंतर्वस्त्र घालायचे की नाही, ही माझी चॉईस…’, कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना हेमांगी कवीने दिली जोरदार चपराक

हे देखील वाचा