Tuesday, April 21, 2026
Home हॉलीवूड शॉकिंग! अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्यामुळे ‘हॅरी पॉटर’च्या लेखिकेला जीवे मारण्याची धमकी, काय आहे प्रकरण?

शॉकिंग! अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्यामुळे ‘हॅरी पॉटर’च्या लेखिकेला जीवे मारण्याची धमकी, काय आहे प्रकरण?

कलाकारांना जीवे मारण्याच्या धमक्यांचे सत्र अजूनही सुरूच आहे. सलमान खान याच्यासारख्या कलाकाराला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. आता आणखी एका दिग्गज कलाकाराला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ती दिग्गज व्यक्ती इतर कुणी नसून ‘हॅरी पॉटर’च्या लेखिका जेके रोलिंग या आहेत. मात्र, त्यांना जीवे मारण्याची धमकी का मिळाली, याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया…

भारतीय मूळ असलेले वादग्रस्त ब्रिटिश लेखक सलमान रुश्दी (Salman Rushdie) यांच्यावर न्यूयॉर्क येथे जीवघेणा हल्ला झाला. स्टेजवर चढून हल्लेखोरांनी त्यांच्या गळ्यावर चाकूने हल्ला केला. सलमान यांच्यावर झालेल्या या हल्ल्याविरुद्ध अनेक कलाकारांनी आवाज उठवला. तसेच, या हल्ल्याची निंदाही केली. ‘हॅरी पॉटर’च्या लेखिका जेके रोलिंग (JK Rowling) यांनीही या हल्ल्याची निंदा केली होती. त्यांनी सलमान यांच्या समर्थनार्थ ट्वीट केले. यानंतर आता त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळत आहे.

सलमान रुश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर जेके रोलिंग यांनी याची निंदा करत ट्वीट केले होते. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले होते की, “अशाप्रकारच्या घटनेने खूप दु:खी आहे. ते लवकरात लवकर ठीक व्हावे.” जेके रोलिंग यांच्या ट्वीटला प्रत्युत्तर देत एका युजरने लिहिले की, “काळजी करू नका, पुढचा नंबर तुमचाच आहे.” रोलिंग यांनीही या धमकीच्या ट्वीटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

स्क्रीनशॉट केला शेअर
जेके रोलिंग यांनी सोशल मीडियावर धमकी देणारे स्क्रीनशॉट शेअर केले आहे. यासोबतच त्यांनी अनेक स्क्रीनशॉट शेअर करत ट्विटरवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी लिहिले की, “ट्विटर हीच तुमची मार्गदर्शक तत्वे आहेत, हो ना? हिंसा: तुम्ही एखाद्या व्यक्ती किंवा लोकांच्या समूहाविरुद्ध हिंसेची धमकी देऊ शकत नाही. आम्ही हिंसेचा गौरव करण्यास देखील नाकारतो.”

कशी आहे सलमान रुश्दी यांची तब्येत?
सलमान रुश्दी यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, त्यांच्या तब्येतीत आधीपेक्षा सुधारणा आहे. असे म्हटले जात आहे की, त्यांना व्हेंटिलेटरवरून हटवले आहे. त्यांना गंभीररीत्या जखमी झाल्यानंतर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

आता चाहतेही ट्विटरवर त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-
भगत सिंगवर बॉलीवूडमध्ये बनले आहे सर्वाधिक चित्रपट, पाहा यादी……
सिद्धू मूसेवालाचे गाणे गाताना मंचावरच कपिल शर्माला कोसळले रडू, ह्रदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल
करण जोहरवर लागला सारा आणि कार्तिकचे नाते सर्वांसमोर आणल्याचा आरोप, शोच्या दिग्दर्शकाने दिले स्पष्टीकरण

हे देखील वाचा