सपना चौधरीला टक्कर देतेय ‘ही’ डान्सर; ‘बुलबुल जैसो बच्चा’ गाण्यावर केला अफलातून डान्स


हरियाणवी ‘डान्सिंग क्वीन’ सपना चौधरीने आपल्या डान्सने आणि आपल्या हटके अदांनी चाहत्यांना वेड लावले आहे. केवळ आपल्या राज्यापुरते मर्यादित न राहता तिने देशातच नव्हे, तर जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, असे असले तरीही तुम्हाला माहिती आहे का? सपनाला टक्कर देणारी आणखी एक हरियाणवी डान्सर आहे. जिने आपल्या डान्सने प्रत्येकाची वाहवा मिळवली आहे. ती डान्सर इतर कुणी नसून संगीता चौधरी आहे. सपनाप्रमाणेच संगीताचेही डान्स व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत. नुकताच तिचा असाच एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तिचा बोल्डनेस पाहायला मिळत आहे. (Haryanvi Dancer Sangeeta Choudhary Dance Video In Bulbul Jara Bacchan Sapna Choudhary)

सध्या देशभरातील अनेक छोट्या मोठ्या डान्सर्सचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यात संगीताचेही नाव आहे. सध्या तिचे हरियाणवी गाण्यांवरील धमाकेदार डान्स व्हिडिओ यूट्यूबवर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओत ती ‘बुलबुल जैसा बच्चा’ या हरियाणवी गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसत आहे.

या व्हिडिओत दिसते की, संगीता स्टेजवर सपनाच्या स्टाईलमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तिची डान्स शैली ही एनर्जेटिक असते. तिचा डान्स पाहून कदाचित कोणीही स्वत: ला नाचण्यापासून थांबवू शकत नाही.

संगीता चौधरीला तिचे काही चाहते दुसरी सपना चौधरी म्हणत आहेत. दुसरीकडे काहीजण म्हणत आहेत की, संगीता ‘हरियाणवी क्वीन’ सपना चौधरीला कॉपी करण्याचा प्रयत्न करते. हरियाणवी गाण्यावरील संगीताच्या डान्ससाठी चाहते दीवाने आहेत.

विशेष म्हणजे संगीता चौधरीपूर्वीही अनेक डान्सर्स अशा आहेत, ज्यांची तुलना सपना चौधरीशी करण्यात आली आहे. यामध्ये प्रांजल दहियाचा समावेश आहे. ती तिच्या व्हायरल झालेल्या अगदी सपना चौधरीसारखी दिसते. प्रांजलच्या डान्स स्टेप्सही सपना चौधरीसारख्याच आहेत. हे पाहून सपना आणि प्रांजलमध्ये फरक करणे चाहत्यांना कठीण होते.


Leave A Reply

Your email address will not be published.