हरियाणवी गायक राजू पंजाबी यांच्या ‘सॅन्डल’ या गाण्याला यूट्यूबवर खूप पसंती मिळत आहे. या व्हिडिओमधील ‘विजय वर्मा’ आणि ‘अंजली राघव’ यांच्या जोडीला चाहत्यांकडून खूपच प्रेम मिळत आहे. गाण्याच्या लोकप्रियतेचा अंदाज या गोष्टीवरून लागतो की, या व्हिडिओला यूट्यूबवर आतापर्यंत 59 करोडपेक्षा अधिक चाहत्यांनी पाहिले आहे.
या आधी राजू पंजाबी यांचे हरियाणवी गाणं ‘खतरा’ याचा व्हिडिओ यूट्यूबवर रिलीझ झाले होते. हे गाणं राजू पंजाबी आणि रुचिका जांगिद यांनी गायले होते. यानंतर ‘नवीन’ यांनी या गाण्याचे बोल दिले होते. तसेच ‘वेस्टर्न पेंडूज’ यांनी या गाण्याला संगीत दिले होते. फॅन्समध्ये या गाण्याला खूपच पसंती मिळत आहे. बघता बघता ते प्रेक्षकांमध्ये व्हायरल देखील झाले आहे.
याव्यतिरिक्त अंजली राघव हिचे हरियाणवी गाणे ‘कुटुगा बराती’ याचा व्हिडिओ देखील यूट्यूबवर खूप व्हायरल झाला होता. यालाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद देखील मिळाला आहे. या गाण्याला अंजली राघव आणि करण चौधरी यांच्यावर चित्रित केले आहे. हे गाणे गगन हरियाणवी फरिश्ताने गायले आहे.
सन 2020 मध्ये अंजली राघव हिने आपली एकापेक्षा एक सुपरहिट गाणी दिली आहेत. अंजली राघव हिचे हरियाणवी संगीत क्षेत्रातील नावाजलेले अभिनेता अजय हुड्डा यांच्या सोबतचे गाणे इंटरनेटवर रातोरात लोकप्रिय झाले होते. आता नवीन वर्षाच्या मुहूर्तावर अजय हुड्डा यांचे गर्लफ्रेंड हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यामध्ये अजय हुड्डासोबत अंजली राघव ही आपल्या सौंदर्याचे जलवे दाखवत आहे.
हे गाणे कॉलेज जीवनातील प्रेम यावर चित्रित केले आहे. या व्हिडिओमध्ये अंजली राघव आणि अजय हुड्डा यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली आहे.
हेही वाचा-
‘लाल साडी’ ने चाहते झाले घायाळ, सुपरस्टार रितेश पांडेचं गाणं यूट्यूबवर जोरदार व्हायरल